IPL 2023 Rohit Sharma Yashasvi Jaiswal wicket: IPLचा हजारावा सामना अतिशय चुरशीचा झाला. शेवटच्या षटकात टीम डेव्हिडने तीन चेंडूत तीन षटकार मारत मुंबई इंडियन्सला सामना जिंकवून दिला. पण हा सामना एका वेगळ्या कारणासाठीही चर्चेत राहिला. त्यातील एक कारण म्हणजे सुमार दर्जाचे अंपायरिंग. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या ऐतिहासिक सामन्यात याची दोन उदाहरणे पाहायला मिळाले. 1000 वा सामना संपला. 214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने हा सामना रोमांचकारी पद्धतीने जिंकला. हा सामना उच्च स्कोअरिंग झाला आणि प्रेक्षकांचेही भरपूर मनोरंजन झाले. पण, या सगळ्यात सोशल मीडियावररोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्या विकेट्सवरून बराच वादंग माजला.
यशस्वी जैस्वालच्या विकेटवरून वाद
राजस्थानच्या डावातील शेवटचे षटक होते. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मुंबईचा वेगवान गोलंदाज अर्शद खानने गोलंदाजी केरील आणि जैस्वालला बाद करण्यात आले. फूल टॉस बॉल त्याच्या बॅटला आदळला आणि हवेत गेला. गोलंदाजानेच तो झेल पकडला. चेंडूची उंची जास्त वाटत असेल तर चेंडू तपासला जातो, त्यामुळे थर्ड अंपायरकडे हा निर्णय गेला. त्यांनी केवळ एकदा फुटेज पाहून सरळ चेंडू वैध असल्याचे सांगितले. पण व्हिडीओ क्लिपमध्ये बॉलची उंची जास्त असून तो नो बॉल असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे अनेकांनी नंतर म्हटले. पंचांच्या निर्णयावर नाराज असलेल्या चाहत्यांनी आरोप केला की, नियम फक्त मुंबई आणि चेन्नईसाठीच असतात का? दरम्यान, यावर संघांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
रोहितच्या विकेटवरूनही वादंग
केवळ यशस्वी जैस्वालच नव्हे, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माही अशाच वाईट अंपायरिंगचा बळी ठरला. मुंबईच्या डावातील दुसरे षटक होते. गोलंदाज संदीप शर्माने सामन्यातील आपल्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकला. तो नकल बॉल होता. रोहितला चेंडू खेळता आला नाही. यष्टिरक्षक सॅमसन स्टंपजवळ उभा होता. रोहित क्लीन बोल्ड झाला असे अपील करण्यात आले. त्यामुळे मैदानावरील पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचाकडे पाठवला. व्हिडिओ फुटेज पाहून तिसऱ्या पंचानी राजस्थानच्या बाजूने निर्णय दिला. पण, नंतर जेव्हा हेच फुटेज सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले तेव्हा हे स्पष्ट झाले की बेल्स बॉलने नाही तर सॅमसनच्या ग्लोव्हजने पडली होती. त्यावरूनही नेटकऱ्यांनी टीका केली.
Web Title: Ipl 2023 video Rohit Sharma Yashasvi Jaiswal wicket bad umpiring Mumbai Indians Rajasthan Royals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.