IPL 2023, RCB vs RR : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर थरारक विजयाची नोंद केली. RCBचा हा इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील चौथा आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील सलग दुसरा विजय ठरला. RCB ने १८९ धावा केल्या होत्या आणि RR ला ६ बाद १८२ धावाच करता आल्या. RCBने ७ धावांनी सामना जिंकला, परंतु कर्णधार विराटला २४ लाखांचा आणि संघातील प्रत्येक खेळाडूला ६ लाख किंवा मॅच फीमधील २५ टक्के रक्कम ( जी कमी असेल ती) दंड म्हणून भरावी लागणार आहे.
RCBकडून फॅफ ड्यू प्लेसिस ( ६२) व ग्लेन मॅक्सवेल ( ७७) यांनी चांगली फटकेबाजी केली, परंतु RRच्या गोलंदाजांनी अखेरच्या ५ षटकांत मॅच फिरवली अन् RCBला ९ बाद १८९ धावांपर्यंत रोखले. ट्रेंट बोल्ट व संदीप शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल यांनी ९८ धावांची भागीदारी करताना RRला चांगली सुरुवात करून दिली. जैस्वाल ४७ आणि पडिक्कल ५२ धावांवर बाद झाले. संजू सॅमसनने २२ धावा केल्या. ध्रुव जुरेल व आर अश्विन यांनी चांगली खेळी केली होती, परंतु मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी केली.
या सामन्यात षटकांची गती संथ राखल्यामुळे विराट कोहलीवर कारवाई केली गेली आहे. विराटला २४ लाखांचा दंड भरावा लागणार आहे, तर इम्पॅक्ट प्लेअरसह संघातील प्रत्येक सदस्याला ६ लाख किंवा मॅच फीमधील २५ टक्के रक्कम ( जी कमी असेल ती) दंड म्हणून भरावी लागणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"