IPL 2023, Virat Kohli Tattoo : विराट कोहलीने दहाव्या टॅटूतून दिला लाखमोलाचा संदेश; जाणून घ्या त्याच्या प्रत्येक टॅटूमागची गोष्ट 

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ( RCB) यंदा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची अपेक्षा आहे आणि माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) त्यासाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 03:39 PM2023-03-31T15:39:17+5:302023-03-31T15:42:00+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, Virat Kohli Tattoo : Virat Kohli's new tattoo meaning - "A Journey of Spiritual symbolism" | IPL 2023, Virat Kohli Tattoo : विराट कोहलीने दहाव्या टॅटूतून दिला लाखमोलाचा संदेश; जाणून घ्या त्याच्या प्रत्येक टॅटूमागची गोष्ट 

IPL 2023, Virat Kohli Tattoo : विराट कोहलीने दहाव्या टॅटूतून दिला लाखमोलाचा संदेश; जाणून घ्या त्याच्या प्रत्येक टॅटूमागची गोष्ट 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Virat Kohli Tattoo : आजपासून इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वाला ( IPL 2023) धुमधडाक्यात सुरूवात होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्या लढतीने IPL 2023 ची सुरूवात होणार आहे. २०१८नंतर प्रथमच आयपीएलमध्ये उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आणि त्यात रश्मीका मंदाना, तमन्ना भाटीया यांचा दमदार परफॉर्मन्स होणार आहे. २०१६मध्ये आयपीएल जेतेपदाच्या अगदी नजीक पोहोचलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ( RCB) यंदा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची अपेक्षा आहे आणि माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) त्यासाठी सज्ज झाला आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट मागील काही काळापासून आऊट ऑफ फॉर्म होता. पण, २०२२च्या शेवटी अन् २०२३ मध्ये त्याने ट्वेंटी-२० व कसोटी क्रिकेटमधील शतकांचा दुष्काळ संपवताना फॉर्म परत मिळवला. वन डे क्रिकेटमध्येही त्याने काही चांगल्या खेळी केल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्याकडून पुन्हा एकदा धावांचा एव्हरेस्ट उभा राहिलेला पाहायला चाहत्यांना आवडणार आहे. विराट सध्या देवदर्शन घेताना अनेकदा दिसला आहे आणि त्याच्या आयुष्यात अध्यात्मिकला महत्त्व आहे. आता त्याने शरीरावर आणखी एक टॅटू गोंदवला आहे आणि त्यातून त्याने लाखमोलाचा संदेश दिला आहे. 

विराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट

  • विराटने डाव्या हाताच्या मागच्या बाजूला आईचे (सरोज) नाव हिंदीत गोंदवून घेतले आहे. उजव्या हाताच्या मागच्या बाजूला वडील प्रेम यांचेही नाव त्याने गोंदवले आहे.  
  • भगवान शंकराचा भक्त असलेल्या विराटने उजव्या हातावर कैलास पर्वतावर ध्यानस्थ शंकराचे चित्र रेखाटले आहे. डाव्या हातावर शांति आणि शक्तीचे प्रतीक म्हणून मठाच टॅटू काढला आहे.
  • 2008 मध्ये विराटने वन डे सामन्यात पदार्पण केले होते. भारताकडून वन डे सामन्यात पदार्पण करणारा तो 175 वा खेळाडू आहे आणि त्याने त्याचाही टॅटू केला आहे.
  • तीन वर्षांनंतर त्याने कसोटीत पदार्पण केले आणि तो 269 खेळाडू होता. तोही आकडा त्याने अंगावर गोंदवला आहे. विराटने मनगटावर आदिवासी कलांचे चित्रही रेखाटले आहे. ते आक्रमकतेचे प्रतिक मानले जाते.
  • विराटच्या उजव्या हातावर स्कॉर्पिओ (विंचू) असे इंग्रजीत लिहिले आहे. विराटचा जन्म हा नोव्हेंबर महिन्यातला आणि हा महिना वृश्चिक राशीचा समजला जातो.
  • डाव्या हातावर त्याने योद्ध्याचे टॅटू काढले आहे. या जपानी योद्ध्याच्या हातात तलवार आहे. या टॅटूला विराट गुडलक मानतो.उजव्या खांद्यावर शक्तीचा प्रतिक असलेल्या 'गॉर्ड्स आय'चा टॅटू आहे. विराटने ॐ चाही टॅटू गोंदवला आहे 

 

विराटने आणखी एक टॅटू गोंदवला आहे आणि त्याचा खूप खोल अर्थ आहे...

  • विराटच्या नव्या टॅटूच्या डिझाइनमधील प्रत्येक घटकाला एक आध्यात्मिक महत्त्व आहे. 'मेटाट्रॉन क्यूब' हे एक पवित्र भौमितिक चिन्ह मानले जाते ज्यामध्ये विश्वातील सर्व आकार आणि नमुने आहेत. 'सेप्टॅगॉन' परिपूर्णता, सुसंवाद आणि संतुलन दर्शवते. 'भौमितिक फूल' सर्व गोष्टींच्या परस्परसंबंधाचे प्रतीक आहे आणि 'घन नमुना' स्थिरता आणि संरचनेचे प्रतीक आहे. या सर्वाचा उद्देश विश्वाशी एकता आणि जोडणीची भावना निर्माण करणे आहे.  

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, Virat Kohli Tattoo : Virat Kohli's new tattoo meaning - "A Journey of Spiritual symbolism"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.