IPL 2023, Virat vs Gambhir fight: विराट कोहलीला नडणारा नवीन उल हक कोण?; शाहिद आफ्रिदीसोबतही असाच भांडला होता...

IPL 2023, Virat Kohli vs Gautam Gambhir fight: लखनौच्या फलंदाजीवेळी १७ व्या षटकात विराट कोहली आणि लखनौच्या नवीन उल हक यांच्यात वादाला सुरुवात झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 08:24 AM2023-05-02T08:24:13+5:302023-05-02T08:37:19+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, Virat vs Gambhir fight: Who is the Naveen Ul Haq to fight Virat Kohli?; Had a similar fight with Shahid Afridi too | IPL 2023, Virat vs Gambhir fight: विराट कोहलीला नडणारा नवीन उल हक कोण?; शाहिद आफ्रिदीसोबतही असाच भांडला होता...

IPL 2023, Virat vs Gambhir fight: विराट कोहलीला नडणारा नवीन उल हक कोण?; शाहिद आफ्रिदीसोबतही असाच भांडला होता...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Virat vs Gambhir fight: फलंदाज अपयशी ठरल्यानंतर गोलंदाजांनी टिच्चून मारा करत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला (आरसीबी) मर्यादित धावसंख्येचे यशस्वी संरक्षण करुन दिले आणि लखनौ सुपरजायंट्सचे कडवे आव्हान १८ धावांनी परतावले. प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत केवळ ९ बाद १२६ धावा केल्यानंतर आरसीबीने लखनौला १९.५ षटकांत १०८ धावांमध्ये गुंडाळले. मात्र आरसीबी आणि लखनौचा सामना विराट कोहलीगौतम गंभीर आणि नवीन उल हकच्या वादामुळे गाजला. 

लखनौच्या फलंदाजीवेळी १७ व्या षटकात विराट कोहली आणि लखनौच्या नवीन उल हक यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. सामना संपल्यानंतर यावरुनच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लखनौ विरोधात विराट कोहली फिल्डिंग करताना उत्साहित दिसला. प्रत्येक सामन्यानंतर जणू बेंगलोरमधील पराभवाचा वचपा काढत होता. विराट कोहलीच्या अग्रेसिव्ह फिल्डिंगवेळी नवीन उल हक आणि अमित मिश्रासोबत बाचाबाची झाली. यांच्यातील वाद सोडवण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली. पण हा वाद इतक्यावरच थांबला नाही. सामना संपल्यानंतरही यांच्यामध्ये बाचाबाची झाली. हात मिळवताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात पुन्हा एकदा बाचाबाची झाली. 

नवीन उल हक कोण आहे?

अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकने लखनौ सुपर जायंट्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा तो अफगाणिस्तानचा सहावा खेळाडू आहे. नवीन उल हकची टी-२० कारकीर्द खूप प्रभावी राहिली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण २७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ३४ विकेट घेतल्या आहेत. लखनौ संघाला नवीन-उल-हककडून मोठ्या आशा होत्या. त्या आशेप्रमाणेच नवीन उल हकने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात ३ विकेट्स पटकावल्या.

नवीन उल हकचा शाहिद अफ्रिदीसोबतही वाद

लंका प्रिमियर लीगमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद अफ्रिदीसोबतही नवीन उल हकचा वाद झाला होता. नवीन-उल-हकनं  मोहम्मद आमीरप्रती अपशब्द वापरले आणि त्यानंतर दोघंही एकमेकांना भांडणासाठी उभे राहिले. अन्य सहकाऱ्यांनी त्यांना दूर नेले. इथेच हा वाद संपला नाही, तर २० व्या षटकात आमीरनं षटकार खेचला आणि नवीनकडे तो रागाने पाहत काहीतरी बोलला. पुन्हा एकदा सहकाऱ्यांनी दोघांना शांत केले. पण, सामना संपल्यानंतर जेव्हा सर्व खेळाडू एकमेकांशी हात मिळवत होते, तेव्हा आफ्रिदीनं नवीन-उल-हकला झापलं. नवीन समोर येण्यापूर्वी आफ्रिदी प्रतिस्पर्धी संघातील अन्य खेळाडूंशी हसून गप्पा मारत होता. पण, नवीन समोर येताच आफ्रिदीचा पारा चढला, क्या हो गया? असं त्यानं रागात विचारले. पुढे तो हेही म्हणाला, मी पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले तेव्हा तुझा जन्मही झाला नव्हता.

Web Title: IPL 2023, Virat vs Gambhir fight: Who is the Naveen Ul Haq to fight Virat Kohli?; Had a similar fight with Shahid Afridi too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.