IPL 2023: ‘सुपर ओव्हर’ची प्रतीक्षा! आयपीएलच्या सलग १४१ सामन्यांत अद्याप योग आला नाही

IPL 2023, Super Over: आयपीएलमध्ये  २०२१ च्या सत्रात ‘सुपर ओव्हर’ झाल्यापासून आतापर्यंत (२० एप्रिल २०२३)  १४१ सामन्यांत अद्याप सुपर ओव्हरची स्थिती आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 05:50 AM2023-04-22T05:50:32+5:302023-04-22T05:51:07+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023: Waiting for the 'Super Over'! In 141 consecutive matches of IPL, the sum has not yet been achieved | IPL 2023: ‘सुपर ओव्हर’ची प्रतीक्षा! आयपीएलच्या सलग १४१ सामन्यांत अद्याप योग आला नाही

IPL 2023: ‘सुपर ओव्हर’ची प्रतीक्षा! आयपीएलच्या सलग १४१ सामन्यांत अद्याप योग आला नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये  २०२१ च्या सत्रात ‘सुपर ओव्हर’ झाल्यापासून आतापर्यंत (२० एप्रिल २०२३)  १४१ सामन्यांत अद्याप सुपर ओव्हरची स्थिती आलेली नाही. चाहत्यांना हा थरार पुन्हा अनुभवायचा आहे. यंदाच्या सत्रात आतापर्यंत २८ सामने झाले आहेत. त्यातील अनेक सामने शेवटच्या षटकापर्यंत आणि अखेरच्या चेंडूपर्यंत रंगले. सामने पाहताना चाहत्यांच्या हृदयाचे ठोकेही चांगलेच वाढले. शेवटचा सुपर ओव्हरचा सामना २५ एप्रिल २०२१ रोजी दिल्ली-हैदराबाद यांच्यात   झाला होता. त्यात दिल्लीने विजय मिळवला. 

२०२० च्या मोसमात ‘डबल सुपर ओव्हर’ 
२०२० च्या मोसमात पंजाब आणि मुंबई यांच्यात हा रोमांचक सामना झाला. या सामन्यात दोन्ही संघांनी समान १७६ धावा केल्या. यानंतर पहिला सुपर ओव्हर झाला. तोही टाय राहिला. यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाब संघाने विजय मिळवला. हा सामना दुबईत झाला होता.

संघांनी किती ‘सुपर ओव्हर’ खेळले आणि जिंकले
 पंजाब किंग्स : ४ सुपर ओव्हर खेळले, ३ जिंकले
 दिल्ली कॅपिटल्स : ४ सुपर ओव्हर खेळले, ३ जिंकले
 मुंबई इंडियन्स : ४ सुपर ओव्हर खेळले, २ जिंकले
 कोलकाता संघ : ४ सुपर ओव्हर खेळले, १ जिंकला
 राजस्थान रॉयल्स : ३ सुपर ओव्हर खेळले, २ जिंकले
 सनरायझर्स हैदराबाद : ४ सुपर ओव्हर खेळले, १ जिंकला
 बेंगळुरू संघ : ३ सुपर ओव्हर खेळले, १ जिंकला
 चेन्नई सुपर किंग्स : १ सुपर ओव्हर खेळला, पराभूत झाला

Web Title: IPL 2023: Waiting for the 'Super Over'! In 141 consecutive matches of IPL, the sum has not yet been achieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.