आयपीएल सुरू होऊन चारच दिवस झाले. खेळाडूंच्या मागे दुखापतींचा ससेमिरा लागलेला आहे. चेन्नईविरुद्ध पहिल्या सामन्यात गुजरातचा केन विल्यमसन जखमी झाल्याने त्याला थेट आयपीएलबाहेर जावे लागले. मुंबईविरुद्धच्या सामन्यातही बंगळुरूच्या रिस टॉपलेचा खांदा चांगलाच दुखावला. त्याच्याही भवितव्यावर सध्या प्रश्नचिन्ह लागले आहे. तसेच बुमराह, पंत आणि प्रसिद्ध कृष्णासारखे काही खेळाडू आयपीएल सुरू होण्यापूर्वीच दुखापतग्रस्त झाल्याने त्यांना या स्पर्धेला मुकावे लागले.
काही विदेशी खेळाडू देशासाठी सामने खेळण्यात व्यस्त असल्याने ते उशिरा आयपीएलचा भाग होतील. मात्र यानिमित्ताने एक प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करून आहे. या दुखापतग्रस्त किंवा अनुपस्थित खेळाडूंना काही पैसे मिळतात का? तसेच त्यांच्या दुखापतींचा खर्च कोण करते? या सगळ्या प्रश्नांचे निरसन करण्याचा लोकमत 'स्पोर्ट्स डेस्क'ने केलेला हा प्रयत्न...