Akash Madhwal: मुंबईला क्वालिफायरमध्ये पोहोचवणारा आकाश मधवाल आहे तरी कोण? पर्सनल लाईफबाबत समोर आली अशी माहिती

IPL 2023, Akash Madhwal: वेगवान गोलंदाज आकाश मधवालने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर एलिमिनेटर लढतीत मुंबई इंडियन्सने लखनौ सुपरजायंट्सवर ८१ धावांनी मात केली. या कामगिरीमुळे आकाश चर्चेचा विषय ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 12:38 PM2023-05-25T12:38:07+5:302023-05-25T12:38:36+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023: Who is Akash Madhwal to take Mumbai to the qualifiers? The information that came out about personal life | Akash Madhwal: मुंबईला क्वालिफायरमध्ये पोहोचवणारा आकाश मधवाल आहे तरी कोण? पर्सनल लाईफबाबत समोर आली अशी माहिती

Akash Madhwal: मुंबईला क्वालिफायरमध्ये पोहोचवणारा आकाश मधवाल आहे तरी कोण? पर्सनल लाईफबाबत समोर आली अशी माहिती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेगवान गोलंदाज आकाश मधवालने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या एलिमिनेटर लढतीत मुंबई इंडियन्सने लखनौ सुपरजायंट्सवर ८१ धावांनी मात केली. या विजयाबरोबरच पाचवेळच्या विजेत्या मुंबईले क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला आहे. आता क्वालिफायर २ मध्ये मुंबईची गाठ गुजरात टायटन्सच्या संघाशी पडणार आहे. आकाश मधवालने लखनौविरुद्धच्या सामन्यात ३.३ षटकांमध्ये केवळ ५ धावा देत ५ विकेट्स टिपल्या. या दरम्यान, आकाशचा इकॉनॉमी रेट १.४० एवढा राहिला. जो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आले. त्याबरोबरच आकाश मधवाल आयपीएलच्या प्लेऑफमध्ये ५ विकेट्स टिपणारा पहिला गोलंदाज बनला आहे.  या कामगिरीमुळे आकाश चर्चेचा विषय ठरला आहे.

आता आकाश मधवालच्या पर्सनल लाईफबाबतही बरीचशी माहिती समोर येत आहे. आकाश मधवाल हा उत्तराखंडमधील रुडकी ढंडेरा येथील रहिवासी आहे. आकाश मधवालकडे इंजिनियरिंगची पदवी आहे. मात्र त्याने क्रिकेटलाच करिअरचं माध्यम म्हणून निवडलं. आकाश मधवाल याच्या वडिलांचा २०१३ मध्ये एका अपघातात मृत्यू झाला होता. ते भारताच्या लष्करात सेवेत होते.

मुळचा रुडकी येथील असलेला आकाश भारतीय संघातील स्टार यष्टीरक्षक रिषभ पंत याचा शेजारी आहे. आकाश मधवाल आणि रिषभ पंत यांनी क्रिकेटचं प्राथमिक प्रशिक्षण अवतार सिंह यांच्याकडून घेतलं होतं. त्यानंतर रिषभ पंत दिल्लीमध्ये शिफ्ट झाला होता.

आकाश मधवाल २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नेट बॉलर होता. २०२२ मधील लिलावात आकाश मधवालला कुणीही खरेदीदार भेटला नाही. मात्र नंतर अचानक त्याचं नशिब पालटलं. २०२२ मध्ये सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाल्यानंतर आकाश मधवालचा मुंबई इंडियन्सच्या संघात रिप्लेसमेंट म्हणून समाविष्ट करण्यात आले. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र २०२३ च्या लिलावामध्येही मुंबई इंडियन्सने अवघ्या २० लाख रुपयांमध्ये त्याला करारबद्ध केले.

घातक यॉर्करमुळे आकाश मधवालकडे भारताचा पुढचा बुमराह म्हणून पाहिलं जात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शेवटच्या षटकांतील भेदक गोलंदाजीमुळे त्याने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. आकाशने आतापर्यंत १० प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये १२, १७ लिस्ट ए सामन्यांमध्ये १८ आणि २९ टी-२० सामन्यांमध्ये २९ बळी टिपले आहेत. आकाश मधवाल लिस्ट ए आणि टी-२०मध्ये उत्तराखंडचा कर्णधार आहे.  

Web Title: IPL 2023: Who is Akash Madhwal to take Mumbai to the qualifiers? The information that came out about personal life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.