Join us  

IPL 2023 : घरी आजारी वडील, आईने क्रिकेट न खेळण्यास बजावले; पण, सुयश शर्माने 'पठाण'समोर जग जिंकले! 

काल इडन गार्डवर कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे मोठी स्टारकास्ट असलेले संघ एकमेकांना भिडले. विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस, शार्दूल ठाकूर, सुनील नरीन, आंद्रे रसेल.. अशी अनेक दिग्गज मंडळी काल कोलकाताच्या ऐतिहासिक स्टेडियमवर दिसली. पण, यात भाव खाऊन गेला तो युवा सुयश शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 4:15 PM

Open in App

IPL 2023 : Who is Suyash Sharma? इंडियन प्रीमिअर लीगने नेहमीत देशातील प्रतिभाव खेळाडूंना आपलं नशीब चमकवण्याचं व्यासपीठ दिलं आहे. काल इडन गार्डवर कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे मोठी स्टारकास्ट असलेले संघ एकमेकांना भिडले. विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस, शार्दूल ठाकूर, सुनील नरीन, आंद्रे रसेल.. अशी अनेक दिग्गज मंडळी काल कोलकाताच्या ऐतिहासिक स्टेडियमवर दिसली. पण, यात भाव खाऊन गेला तो युवा सुयश शर्मा ( Suyash Sharma)... १४३८ दिवसांनंतर KKRचा संघ RCB ला भिडला अन् शार्दूलने सर्वांना आश्चर्यचकीत केले. KKRच्या २०४ धावांच्या प्रत्युत्तरात RCBचा संपूर्ण संघ १२३ धावांवर गडगडला.  

एका पराभवाने RCBला आपटले! नेट रनरेट + मधून मायनसमध्ये अन् तिसऱ्या क्रमांकावरून थेट...

आयपीएलमध्ये पदार्पण सामना खेळताना, १९ वर्षीय सुयशने ४ षटकांच्या स्पेलमध्ये दिनेश कार्तिक, अनुज रावत आणि कर्ण शर्मा सारख्या फलंदाजांना ३० धावा देऊन बाद केले. देशांतर्गत क्रिकेटचा अनुभव पाठिशी नसलेल्या सुयशबद्दल जाणून घेण्यासाठी सर्व 'गुगल बाबा'ची मदत घेऊ लागले, परंतु तिथेही त्यांना फार काही सापडले नाही. केकेआरचा कर्णधार नितीश राणानेही सामना संपल्यानंतर सांगितले की, तो कोण आहे हे मला देखील माहीत नाही. 

दोघेही दिल्लीचे क्रिकेटर आहेत. सुयश हा दिल्लीतील भजनपुरा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकही प्रथम श्रेणी, ट्वेंटी-२० किंवा लिस्ट ए सामना खेळलेला नाही. सुयशचा दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन लीगमध्ये देना बँक संघात समावेश करण्यात आला होता. त्याच्याबद्दल दिल्लीचे माजी क्रिकेटपटू करतार नाथ म्हणाले की, सुरेश बत्रा यांनी मला सात वर्षांपूर्वी या खेळाडूबद्दल सांगितले होते. त्याचवेळी प्रभावित होऊन आम्ही त्याला देना बँकेच्या संघात समाविष्ट केले. मात्र, २०२० मध्ये कोरोना व्हायरसच्या वेळी सुयशच्या आईने मला एके दिवशी फोन केला आणि सांगितले की, तिचा मुलगा आता क्रिकेट खेळणार नाही. त्यावेळी मी त्याला धीर धरण्यास सांगितले आणि सुयशला कोरोनाच्या काळात अधिक सराव करण्याची परवानगी देण्याचेही मान्य केले. त्याच्या आईने माझा सल्ला मान्य केला आणि हा क्रिकेटर परत येऊ शकला. ( सुयश शर्माने घेतलेल्या विकेट्स पाहण्यासाठी क्लिक करा

सुयश दिल्लीकडून २५ वर्षांखालील क्रिकेट खेळतो आणि उजव्या हाताचा मिस्ट्री लेग-स्पिनर असण्यासोबतच त्याला जेव्हाही संधी मिळते तेव्हा तो बॅट स्विंगही करतो. IPL 2023 च्या लिलावापूर्वी सुयशला चाचण्यांसाठी बोलावण्यात आले होते. सुयशची गोलंदाजी पाहिल्यानंतर केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी लिलावादरम्यान त्याच्यासाठी मोठी रक्कम ठेवली होती. पण जेव्हा लिलावात त्याच्यावर इतर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही, तेव्हा तो केवळ २० लाखांच्या मूळ किमतीवर KKR मध्ये सामील झाला. 

मागील एक वर्ष सुयशसाठी खूप अडचणीचं गेलं. आर्थिक स्थिती बेताची नसलेल्या कुटुंबातील सुयशच्या वडीलांना कॅन्सर असल्याचे निदान झाले. वडिल आजारी असतानाही सुयशने त्याच्या स्वप्नांचा पाठलाग थांबवला नाही. मुंबई इंडियन्सचे टॅलेंट स्काऊटचे व्यवस्थापक राहुल संघवी हे सुयशच्या मदतीला पुढे आले आहेत आणि त्याच्या वडिलांचे मुंबईत उपचार सुरू आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App