IPL 2023, Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये १० सामन्यांत ५ विजय मिळवले आणि पाचमध्ये पराभव पत्करला आहे. १० गुणांसह मुंबई इंडियन्स गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे पाचवेळच्या विजेत्या MIला पुढील चारही सामने जिंकून प्ले ऑफमध्ये प्रवेश करता येणार आहे. आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सने अखेर दोन वर्षांनी का होईना अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी दिली आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला. पण, ४ सामने अर्जुला संधी दिल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) त्याच्या नावाचा विचारही केला नाही. कारण....
१६ एप्रिल २०२३ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात अर्जुनने आयपीएल २०२३ मध्ये पदार्पण केले. पहिले षटक चांगले टाकल्यानंतर अर्जुन दुसऱ्या षटकात थोडा महाग पडला. त्याने त्या सामन्यात २ षटकांत १७ धावा दिल्या. त्या सामन्यात सूर्यकुमार यादव कर्णधार होता आणि त्यानंतर त्याने अर्जुनला तिसरे षटक दिले नाही. दोन दिवसांनी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अर्जुनने आयपीएलमधील पहिली विकेट घेतली अन् दोन षटकांत १ बाद १८ धावा अशी स्पेल टाकली. पण, २२ एप्रिलला पंजाब किंग्सविरुद्ध तो महाग ठरला आणि त्याच्या एका षटकात २५-२६ धावा चोपल्या गेल्या. तिथून पंजाबने डोकं वर काढण्याची संधी मिळाली आणि पंजाबला विजयी धावसंख्या उभी करता आली. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने ९ धावांत १ विकेट घेतली व १३ धावाही केल्या. पण, त्यानंतर अर्जुन बाकावर बसून आहे.
गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी ही अर्जुनला न खेळवण्यामागचं प्रमुख कारण आहे. जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त असल्याने फार सामने खेळू शकला नाही. जेसन बेहरनडॉर्फ चांगला मारा करतोय, परंतु दुसऱ्या बाजूने त्याला साथ देणारा कोणी नाही. कॅमेरून ग्रीनचीही धुलाई झालीय.. पियूष चावला MIचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरतोय.. पण, तरीही MI ला सक्षम गोलंदाजीचा पर्याय तयार करता आलेला नाही. त्यामुळे आता स्पर्धेतील आव्हान टिकवायचे असेल तर संघातील सर्वोत्तम खेळाडूंसह मैदानावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशात नवख्या अर्जुनला संधी देऊन पायावर धोंडा मारायचा नाहीच आहे, शिवाय धुलाई झाल्यास अर्जुनचा आत्मविश्वासही खचण्याची भीती आहेच.