IPL 2023,KKR vs GT Live : गुजरात टायटन्स टेबल टॉपर; कोलकाता नाइट रायडर्स प्ले ऑफमधून बाद? पाहा समीकरण

IPL 2023,Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Live  : गुजरात टायटन्सने इडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सवर दणदणीत विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 07:50 PM2023-04-29T19:50:13+5:302023-04-29T19:50:28+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023,KKR vs GT Live : GUJRAT TITANS NOW TABLE TOPPERS, Beat Kolkata Knight Riders by 7 wickets  | IPL 2023,KKR vs GT Live : गुजरात टायटन्स टेबल टॉपर; कोलकाता नाइट रायडर्स प्ले ऑफमधून बाद? पाहा समीकरण

IPL 2023,KKR vs GT Live : गुजरात टायटन्स टेबल टॉपर; कोलकाता नाइट रायडर्स प्ले ऑफमधून बाद? पाहा समीकरण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023,Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Live  : गुजरात टायटन्सने इडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सवर दणदणीत विजयाची नोंद केली. गतविजेत्या GT ने आजचा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली, तर KKRचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आल्यात जमा झाले. ९ सामन्यांमधील हा त्यांचा सहावा पराभव ठरला. 


एन जगदीशन ( १९) लगेच माघारी परतल्यानंतरह रहमनुल्लाह गुरबाजने अफगाणिस्तानचा सहकारी राशीद खान याला टार्गेट करताना खणखणीत फटके खेचले. वेंकटेश अय्यर ( ११) धावांवर पायचीत झाला नितीश राणा आज अपयशी ठरला. रिंकू सिंगने ( १९) फॉर्म कायम राखताना गुरबाजला चांगली साथ दिली. दमदार फलंदाजी करणाऱ्या गुरबाजला अफगाणिस्तानचाच गोलंदाज नूर अहमदने बाद केले. गुरबाजने ३९ चेंडूंत ५ चौकार व ७ षटकारांसह ८१ धावा केल्या. कोलकाताने ७ बाद १७९ धावा केल्या. मोहम्मद शमीने ३, जॉश लिटल व नूर अहमद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

 
GT ने प्रत्युत्तरात दमदार सुरूवात केली. शुबमन गिलने चांगले फटके मारले. आद्रे रसेलने कोलकाताला पहिले यश मिळवून देताना वृद्धीमान साहाला माघारी पाठवून ४९ धावांवर पहिला धक्का दिला. हार्दिक पांड्या व शुबमन यांनी अर्धशतकी भागीदारी करून कोलकाताचे टेंशन वाढवले होते. हर्षित राणाने ही जोडी तोडताना हार्दिकची (२६) विकेट घेतली. शुबमनने त्याचा फॉर्म कायम राखताना २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सुनील नरीनच्या फिरकीवर KKR चा स्टार फलंदाज गडबडला.  ४९ धावांवर शुबमन बाद झाला. 


विजय शंकर आणि डेव्हिड मिलर यांनी चौथ्या विकेटसाठी ५०+ धावांची भागीदारी करून KKR चा पराभव निश्चित केला. शंकरने २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मिलर १८ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३२ धावांवर नाबाद राहिला. शंकरने २४ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला. टायटयन्सने १७.५ षटकांत ३ बाद १८० धावा केल्या आणि ७ विकेट्स व १३ चेंडू राखून सामना जिंकला. या विजयामुळे टायटन्सचे १२ गुण झाले आहेत आणि ते टॉपवर पोहोचले आहेत. KKR ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहेत आणि आता त्यांना उर्वरित पाचही सामने जिंकावे लागणार आहेत. 

 

Web Title: IPL 2023,KKR vs GT Live : GUJRAT TITANS NOW TABLE TOPPERS, Beat Kolkata Knight Riders by 7 wickets 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.