Join us  

हार्दिक पांड्या मुंबईचा नवा कर्णधार अन् रोहितचा चाहता संतापला, धक्कादायक व्हिडीओ Viral

hardik pandya mi captain : आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 1:49 PM

Open in App

आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. अशातच मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने शुक्रवारी एक मोठी घोषणा करत हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. रोहित शर्मा कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर चाहते रोष व्यक्त करत आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. रोहितच्याच नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले होते. याशिवाय रोहितच्यात नेतृत्वात मुंबईने पाचवेळा आयपीएलचा किताब उंचावला. पण शुक्रवारी या फ्रँचायझीने सर्वांना चकित करत मोठा निर्णय घेतला.

दरम्यान, रोहितला कर्णधार पदावरून काढल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली. याशिवाय संपूर्ण क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली. यामुळे रोहितचे चाहते चांगलेच संतापले असून यातील एका चाहत्याने मुंबई इंडियन्सची कॅपही जाळली. रोहितने २०१३ पासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने २०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२० मध्ये विजेतेपद पटकावले. 

रोहितच्या चाहत्यांचा संताप हार्दिक पांड्याला मुंबईचा कर्णधार करण्याचा निर्णय समोर येताच रोहितचे चाहते निराश झाले. या कारणामुळे मुंबईनेही सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स गमावले. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चाहता मुंबई इंडियन्सची कॅप जमिनीवर टाकतो आणि नंतर पायाने चिरडतो. तसेच संतप्त चाहत्याने मुंबईच्या संघाची कॅप जाळून रोष व्यक्त केला. 

हार्दिक पांड्याचा प्रवासहार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी मुंबई इंडियन्सकडे १५.२५ कोटीच रक्कम शिल्लक होती आणि गुजरात हार्दिकला १५ कोटी देत होते. त्यामुळे मुंबईला हार्दिकला संघात घेण्यासाठी पैसे कमी पडले होते. त्यांनी १७.५ कोटींत खरेदी केलेल्या कॅमेरून ग्रीनला RCB सोबत ट्रेड करून पर्समधील रक्कम वाढवली अन् हार्दिकला मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात घेतले. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सला आपल्या पदार्पणाच्या हंगामात किताब जिंकण्यात यश आले. 

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्सहार्दिक पांड्याट्रोल