आयपीएलमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या अत्यंत रोमांचक लढतीत लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपरकिंग्सचा ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईने घरच्या मैदानावर दिलेले २११ धावांचे आव्हान लखनौने मार्कस् स्टॉयनिसच्या तुफानी शतकाच्या जोरावर शेवटच्या षटकात गाठले. या विजयासह लखनौने ८ सामन्यांतून ५ विजयांसह गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. मात्र या सामन्यानंतर चेपॉकवरील स्टॉयनिसच्या वादळी खेळीबरोबरच आणखी एका घटनेची चर्चा होत आहे. ती बाब म्हणजे लखनौने मिळवलेल्या सनसनाटी विजयानंतर लखनौच्या एका चाहत्याने सीएसकेच्या फॅन्सच्या गराड्यात राहूनही नवाबी थाटात केलेला विजयाचा जल्लोष ही होय.
चेन्नईचं होम ग्राऊंड असलेल्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सीएसकेचा सामना करणं ही खूप कठीण बाब मानली जाते. त्याचं कारण म्हणजे येथे चेन्नईच्या खेळाडूंना आणि संघाला फॅन्सकडून मिळणारा जबरदस्त पाठिंबा. तसे आयपीएलमध्ये चेन्नईच्या प्रत्येक सामन्यावेळी त्यांचे पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मात्र चेपॉक स्टेडियमची काही बातच और असते. येथे येणाऱ्या चेन्नईच्या फॅन्सच्या पिवळ्या वादळाला पाहून मोठमोठे संघ आणि खेळाडूही अडखळतात. येथे चेन्नईच्या चाहत्यांचा असणारा आवेश पाहण्यासारखा असतो. त्यात चेन्नईचा संघ आघाडीवर असेल तर मग हा उत्साहा शिगेला पोहोचतो. मात्र लखनौने काल चेन्नईच्या घरच्या मैदानावरच त्यांचे आव्हान परतवून लावले. चेन्नईने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा लखनौच्या खेळाडूंनी तुफानी पद्धतीने पाठलाग सुरू केल्याने चेन्नईच्या फॅन्समध्ये अस्वस्थता पसरली होती. अखेरीस मार्क स्टॉयनिसने विजयी चौकार ठोकल्यावर चेन्नईच्या फॅन्समध्ये भयाण शांतता पसरली होती.
वेळापूर्वी सहजपणे जिंकेल असा वाटणार सामना चेन्नईचा संघ कसा हरला, असा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र याचवेळी चेन्नईच्या फॅन्सच्या गराड्यात लखनौचा एक पाठिराखा जल्लोष करताना दिसला. सीएसकेच्या फॅन्सची आजूबाजूला गर्दी असूनही त्याने आपलं सेलिब्रेशन मनसोक्तपणे सुरू ठेवलं होतं. त्याचा हा जल्लोष कॅमेरामननी टिपला आणि बघता बघता त्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. सामना आटोपल्यानंतर या फॅन्सने केलेल्या जल्लोषाची एकच चर्चा सुरू होती. आता आज सकाळपासून या फॅन्सवरून वेगवेगळे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Web Title: IPL 2024: After LSG's win, he showed his nawabi look in the crowd of CSK fans, the photo is going viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.