IPL Auction 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी सुरु असलेल्या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सर्वाधिक डिमांड पाहायला मिळतेय. मिचेल स्टार्क व पॅट कमिन्स यांनी २० कोटींचा टप्पा ओलांडला. ट्रॅव्हिस हेडही मालामाल झाला. त्यात ऑस्ट्रेलियाकडून एकही आंतरराष्ट्रीय मॅच न खेळलेल्या स्पेन्सर जॉन्सनला ( Spencer Johnson ) १० कोटी रुपयांत गुजरात टायटन्सने आपल्या ताफ्यात घेतले. समीर रिझवी, शुभम दुबे यांच्या पंक्तित कुमार कुशाग्रा ( Kumar Kushagra) हे अनकॅप खेळाडूही मालामाल झाले. दुबईत पार पडलेल्या लिलावात ७२ खेळाडूंवर बोली लावली गेली आणि २३०.४५ कोटी खर्च केले गेले.
IPL 2024 Auction मधील महागडे खेळाडू
- मिचेल स्टार्क ( कोलकाता नाइट रायडर्स ) - २४.७५ कोटी
- पॅट कमिन्स ( सनरायझर्स हैदराबाद ) - २०.५० कोटी
- डॅरिल मिचेल ( चेन्नई सुपर किंग्स ) - १४ कोटी
- हर्षल पटेल ( पंजाब किंग्स ) - ११.७५ कोटी
- अल्झारी जोसेफ ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ) - ११.५० कोटी
- समीर रिझवी ( चेन्नई सुपर किंग्स) - ८.४० कोटी
- रायली रूसो ( पंजाब किंग्स ) - ८ कोटी
- शाहरुख खान ( गुजरात टायटन्स) - ७.४० कोटी
- रोव्हमन पॉवेल ( राजस्थान रॉयल्स) - ७.४० कोटी
- कुमार कुशाग्र ( दिल्ली कॅपिटल्स) - ७.२० कोटी
- ट्रॅव्हिस हेड ( सनरायझर्स हैदराबाद ) - ६.८० कोटी
लिलावाच्या अखेरच्या टप्प्यात अनसोल्ड खेळाडूंवर पुन्हा बोली लावली गेली. भारताचा करूण नायर अनसोल्ड राहिला, तर मनिष पांडे ५० लाखांच्या मुळ किमतीत कोलकाता नाइट रायडर्सकडे गेला. ल्युकी फर्ग्युसन ( २ कोटी मुळ किंमत) RCB च्या ताफ्यात दाखल झाला. स्टीव्ह स्मिथ अनसोल्ड राहिला. पण, दक्षिण आफ्रिकेचा रिली रोसूला ( Rileee Rossouw ) पंजाब किंग्सने ८ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले.
कोणत्या संघाने आज कोणाला ताफ्यात घेतले?
- चेन्नई सुपर किंग्स - डॅरिल मिचेल ( १४ कोटी), समीर रिझवी ( ८.४० कोटी), शार्दूल ठाकूर ( ४ कोटी), मुस्ताफिजूर रहमान ( २ कोटी), रचिन रविंद्र ( १.८० कोटी), अवनिश राव आरावेल्ली ( २० लाख)
- दिल्ली कॅपिटल्स - कुमार कुशाग्रा ( ७.२० कोटी), झाय रिचर्डसन ( ५ कोटी), हॅरी ब्रुक ( ४ कोटी), सुमीत कुमार ( १ कोटी), त्रिस्तान स्टुब्स ( ५० लाख), रसिख दार ( २० लाख), रिकी भुई ( २० लाख), स्वास्तिक चिकारा ( २० लाख).
- गुजरात टायटन्स - स्पेन्सर जॉन्सन ( १० कोटी), शाहरुख खान ( ७.४० कोटी), उमेश यादव ( ५.८० कोटी), रॉबिन मिंझ ( ३.६० कोटी), सुशांत मिश्रा ( २.२० कोटी), आझमतुल्लाह ओमारझाई ( ५० लाख), मानव सुतार ( २० लाख), कार्तिक त्यागी ( ६० लाख)
- कोलकाता नाइट रायडर्स - मिचेल स्टार्क ( २४.७५ कोटी), मुजीब रहमान ( २ कोटी), शेर्फाने रुथरफोर्ड ( १.५० कोटी), गस एटकिसन ( १ कोटी), मनिष पांडे ( ५० लाख), केएस भरत ( ५० लाख), चेतन सकारिया ( ५० लाख), अंगरिष रघुवंशी ( २० लाख), रमनदीप सिंग ( २० लाख), साकिब हुसैन ( २० लाख)
- लखनौ सुपर जायंट्स - शिवम मावी ( ६.४० कोटी), एम सिद्धार्थ ( २.४० कोटी), डेव्हिड विली ( २ कोटी), एश्टन टर्नर ( १ कोटी), अर्शीन कुलकर्णी ( २० लाख), मोहम्मद अर्शद खान ( २० लाख)
- मुंबई इंडियन्स - गेराल्ड कोएत्झी ( ५ कोटी), नुवान तुषारा ( ४.८० कोटी), दिलशान मदुशंका ( ४.६० कोटी), मोहम्मद नबी ( १.५० कोटी), श्रेयस गोपाल ( २० लाख), शिवालिक शर्मा ( २० लाख), अंशुल कम्बोज ( २० लाख), नमन धीर ( २० लाख)
- पंजाब किंग्स - हर्षल पटेल ( ११.७५ कोटी), रिली रोसू ( ८ कोटी), ख्रिस वोस्क ( ४.२० कोटी), तमन त्यागराजन ( २० लाख), विश्वनाथ प्रताप सिंग ( २० लाख), आशुतोष शर्मा ( २० लाख), शशांक सिंग ( २० लाख), प्रिन्स चौधरी ( २० लाख)
- राजस्थान रॉयल्स - रोव्हमन पॉवेल ( ७.४० कोटी), शुभम दुबे ( ५.८० कोटी), नांद्रे बर्गर ( ५० लाख), टॉम कोह्लेर-कॅडमोर ( ४० लाख), आबिद मुश्ताक ( २० लाख)
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - अल्झारी जोसेफ ( ११.५० कोटी), यश दयाल ( ५ कोटी), ल्युकी फर्ग्युसन ( २ कोटी), टॉम कुरन ( १.५० कोटी), सौरव चौहान ( २० लाख), स्वप्निल सिंग ( २० लाख)
- सनरायझर्स हैदराबाद - पॅट कमिन्स ( २०.५० कोटी), ट्रॅव्हिस हेड ( ६.८० कोटी), जयदेव उनाडकट ( १.६० कोटी), वनिंदू हसरंगा ( १.५० कोटी), झाथवेध सुब्रमन्यम ( २० लाख), आकाश सिंग ( २० लाख)
Web Title: IPL 2024 auction concludes : 72 players sold in Dubai today as teams spent a total of Rs 230.45 crore, Find out which team bought whom
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.