IPL Auction 2024 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज विक्रमी बोली लावली गेली. ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार पॅट कमिन्स ( captain Pat Cummins) याला दसपट किंमत मिळाली. २ कोटी मुळ किंमत असलेल्या पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने २० कोटी मोजले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्याच्या मिचेल स्टार्कने ( Mitchell Starc ) सर्वाधिक बोली लागली गेली. ३१.७० कोटी पर्समध्ये असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सने २४.७५ लाख स्टार्कसाठी मोजले.
२ कोटी मुळ किंमत असलेल्या मिचेल स्टार्कसाठी मुंबई इंडियन्सने पहिली बोली लावली. त्यानंतर रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सने पॅडल उंचावले. माहेला जयवर्धने जोफ्रा आर्चरची रिप्लेसमेंट म्हणून स्टार्ककडे पाहत होता. मुंबई व दिल्ली यांच्यातल्या स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्सने ९.८ कोटींची बोली लावून एन्ट्री घेतली. स्टार्ससाठीचा आकडा १० कोटींच्या पार गेल्यावर गुजरात टायटन्सनेही बोली लावली.
आता गुजरात टायटन्स व कोलकाता यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. गुजरातने १२ कोटी बोली लावून आघाडी घेतली होती. पण, कोलकातानेही माघार नाही घेतली १५.५ कोटी बोली लावून तेही टक्कर देत राहिले. गुजरातने २० कोटींची बोली लावताच कोलकाताच्या टेबलवर थोडी चर्चा झालेली पाहायला मिळाली. पण, मेंटॉर गौतम गंभीर ठाम होता आणि त्याने बोली सुरूच ठेवली. कोलकाताने २४.७५ कोटी बोली लावून स्टार्कला आपल्या ताफ्यात घेतले.
- मिचेल स्टार्क ( कोलकाता नाइट रायडर्स) २४.७५ कोटी
- पॅट कमिन्स ( सनरायझर्स हैदराबाद ) २०.५ कोटी
- सॅम कुरन ( पंजाब किंग्स ) - १८.५ कोटी
- कॅमरून ग्रीन ( मुंबई इंडियन्स ) - १७.५ कोटी
- बेन स्टोक्स ( चेन्नई सुपर किंग्स ) - १६.२५ कोटी
ख्रिस मॉरिस ( राजस्थान रॉयल्स) - १६.२५ कोटी