IPL 2024 : आगामी IPL 2024 साठी BCCI ने तयारी सुरू केली आहे. अलीकडेच दुबईमध्ये मिनी लिलाव पार पडला, ज्यात अनेक खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला. दरम्यान, BCCI ने स्पॉन्सरशिपबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयपीएल 2024 साठी टायटल स्पॉन्सरचा शोध सुरू आहे, पण बीसीसीआय टायटल स्पॉन्सरशिपसाठी चीनवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआयने काढलेल्या टेंडरमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, ज्या देशांचे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध नाहीत, त्यांना या निविदेत महत्त्व दिले जाणार नाही.
टायटल स्पॉन्सरशिपसाठी वार्षिक 360 कोटी रुपये ठरवण्यात आले आहे. दरम्यान, चिनी फोन कंपनी Vivo पूर्वी आयपीएलची टायटल स्पॉन्सर होती, परंतु 2020 मध्ये भारत-चीन सीमेवर परिस्थिती बिघडली आणि बीसीसीआयने Vivo ला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर Tata एका वर्षासाठी टायटल स्पॉन्सर झाली.
बीसीसीआयने टेंडरमध्ये काय लिहिले?आता बीसीसीआयने आपल्या निविदेत लिहिले आहे की, भारताशी चांगले संबंध नसलेल्या कोणत्याही देशाशी बोलीदाराचा संबंध असू नये. जर असा कोणी बोलीदार पुढे आला तर त्याला त्याच्या भागधारकांशी संबंधित सर्व माहिती बोर्डाला द्यावी लागेल आणि त्यानंतरच बोलीवर निर्णय घेतला जाईल.
ऑनलाईन सट्टा कंपन्यांवरबंदीएवढंच नाही तर फॅन्टसी गेम्स, क्रिप्टोकरन्सी आणि बेटिंगशी संबंधित कंपन्यांवरही बोर्डाने बंदी घातली आहे. याशिवाय, या खेळाशी संबंधित कपड्यांच्या निर्मितीमध्ये अॅक्टिव्ह असलेल्या कंपन्यादेखील टायटल स्पॉन्सरशिपसाठी बोली लावू शकणार नाहीत. तसेच, टायटल स्पॉन्सरशिप कॉन्ट्रॅक्ट पाच वर्षांसाठी(2024 ते 2029) पर्यंत असेल.