चेपॉकवर CSK चे ऋतु'राज'! कोलकाताचा विजयरथ रोखला, Point Table मध्ये फेरबदल झाला

चेन्नई सुपर किंग्सने सलग दोन पराभवानंतर आयपीएल २०२४ मध्ये अखेर तिसरा विजय नोंदवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 10:50 PM2024-04-08T22:50:40+5:302024-04-08T23:01:09+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : First fifty as the CSK captain for Ruturaj Gaikwad, CSK beat KKR by 7 wickets, Chennai team third position on Point Table  | चेपॉकवर CSK चे ऋतु'राज'! कोलकाताचा विजयरथ रोखला, Point Table मध्ये फेरबदल झाला

चेपॉकवर CSK चे ऋतु'राज'! कोलकाताचा विजयरथ रोखला, Point Table मध्ये फेरबदल झाला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सने सलग दोन पराभवानंतर आयपीएल २०२४ मध्ये अखेर तिसरा विजय नोंदवला. कोलकाता नाईट रायडर्सचा विजयरथ त्यांनी रोखला. चेपॉकवरील सामन्यात CSK च्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आणि त्यामुळेच स्फोटक फलंदाजांची फळी असलेल्या KKR ला जखडून ठेवले. विजयी चौकार मारून Point Table मध्ये अव्वल स्थानी सरकण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या KKRला तीन सामन्यानंतर पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. 


CSK च्या गोलंदाजांनी आज कमाल केली. रवींद्र जडेजा व तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेताना KKR च्या स्फोटक फलंदाजांना शांत ठेवले. तुषारने पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टला बाद केले. त्यानंतर जडेजाने ८ चेंडूंत ३ विकेट्स घेऊन सामनाच पलटला. KKR कडून अंगकृष रघुवंशी ( २४), सुनील नरीन ( २७) व कर्णधार श्रेयस अय्यर ( ३४) यांनी चांगला खेळ केला. पण, त्यांना मोठी खेळी करण्यापासून चेन्नईच्या गोलंदाजांनी रोखले. रवींद्र जडेजाने ४-०-१८-३ व तुषारने ४-०-३३-३ अशी स्पेल टाकली. मुस्ताफिजूर रहमानने दोन विकेट्स घेतल्या. KKR ला २० षटकांत ९ बाद १३७ धावाच करता आल्या.


रचीन रविंद्र व ऋतुराज गायकवाड यांनी चांगली सुरुवात करून देताना २७ धावा जोडल्या. वैभव अरोराने KKR ला पहिले यश मिळवून देताना रविंद्रला ( १५) माघारी पाठवले. पण, कर्णधार ऋतुराज व डॅरील मिचेल मैदानावर उभे राहिले आणि दोघांनी अर्धशतकी भागीदारी करून चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. ऋतुराजने ४५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून हे त्याचे पहिलेच अर्धशतक ठरले आणि मागील ५ वर्षांत CSK च्या कर्णधाराकडून झालेले हे पहिलेच अर्धशतक आहे. ऋतुराज व मिचेल यांनी ५५ चेंडूंत ७० धावा जोडल्या. सुनील नरीनने ही जोडी तोडताना मिचेलला ( २५) त्रिफळाचीत केले.


इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या शिवम दुबेने ताबडतोड फटकेबाजी केली. ऋतुराज ५८ चेंडूंत ९ चौकारांसह ६७ धावांवर नाबाद राहिला. शिवमने १८ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २८ धावांवर त्रिफळाचीत झाला. विजयासाठी ३ धावा हव्या असताना महेंद्रसिंग धोनी आला अन् स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. चेन्नईने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि गुणतालिकेत ६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिले. नेट रन रेटच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्स तिसरे राहिले.  
 

Web Title: IPL 2024, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : First fifty as the CSK captain for Ruturaj Gaikwad, CSK beat KKR by 7 wickets, Chennai team third position on Point Table 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.