चेन्नईच्या रणनीतीसमोर कोलकाताने गुडघे टेकले; तुषार देशपांडे, रवींद्र जडेजा चमकले

रवींद्र जडेजाच्या गेम चेंजिंग ८ चेंडूंनी चेन्नई सुपर किंग्सला सामन्यावर पकड मजबूत करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 09:12 PM2024-04-08T21:12:01+5:302024-04-08T21:16:38+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : Ravindra Jadeja & Tushar Deshpande took 3 wickets each, KKR set 138 run target to CSK  | चेन्नईच्या रणनीतीसमोर कोलकाताने गुडघे टेकले; तुषार देशपांडे, रवींद्र जडेजा चमकले

चेन्नईच्या रणनीतीसमोर कोलकाताने गुडघे टेकले; तुषार देशपांडे, रवींद्र जडेजा चमकले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : रवींद्र जडेजाच्या गेम चेंजिंग ८ चेंडूंनी चेन्नई सुपर किंग्सला सामन्यावर पकड मजबूत करून दिली. कोलकाता नाइट रायडर्स ज्या स्फोटक सुरुवातीसाठी ओळखला जातो, तो आज शांत ठेवण्यात चेन्नईला यश आले. तुषार देशपांडेनेही ३ विकेट्स घेतल्या. मुस्ताफिजूर रहमानने २०व्या षटकात दोन विकेट्स घेतल्या. 


CSKने टॉस जिंकून जिंकून KKR ला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. फिल सॉल्टला पहिल्याच चेंडूवर तुषार देशपांडेने माघारी पाठवले. अंगकृष रघुवंशी व सुनील नरीन यांच्या अर्धशतकी भागीदारीने KKR ला सावरले होते. पण, गोलंदाजीतील बदल CSK च्या फायद्याचा ठरला. सातव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजाने रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करणाऱ्या रघुवंशीला ( २४) पायचीत केले आणि पाचव्या चेंडूवर  नरीनची ( २७) विकेट मिळवून दिली. या विकेटसाठी महेंद्रसिंग धोनीने खास फिल्डींग लावलेली आणि लाँग ऑफवर थिक्षणाने झेल घेतला. जडेजाने त्याच्या पुढच्या षटकात वेंकटेश अय्यरला ( ३) माघारी पाठवून KKR ला चौथा धक्का दिला. CSKने फिरकीचा मारा सुरू केला आणि महिष तिक्षणाने पाचवा धक्का देताना रमणदीप सिंगचा ( १३) त्रिफळा उडवला.  


रवींद्र जडेजाने ४-०-१८-३ अशी स्पेल टाकली. चेन्नईने त्यांच्या फिरकी माऱ्याचा सुरेख वापर करून घेताना कोलकाताच्या धावगतीवर वेसण घातले होते. श्रेयस अय्यर व रिंकू सिंग यांच्यावर मोठी जबाबदारी होती. तुषार देशपांडेने डावातील दुसरी विकेट घेताना रिंकू सिंगला ( १०) माघारी पाठवले. तुषारने स्फोटक आंद्रे रसेलला ( १०) स्वस्तात बाद करून डावातील तिसरी विकेट घेतली. तुषारने ४-०-३३-३ अशी स्पेल टाकली. १९व्या षटकांत श्रेयस अय्यर ( ३४) याला मुस्ताफिजूर रहमानने बाद केले.  कोलकाताला ९ बाद १३७ धावा करता आल्या. 

Web Title: IPL 2024, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : Ravindra Jadeja & Tushar Deshpande took 3 wickets each, KKR set 138 run target to CSK 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.