IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) याने खणखणीत शतक झळकावले. चेन्नई सुपर किंग्ससाठी कर्णधार म्हणून शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्याला शिबम दुबेची खणखणीत साथ मिळाली आणि दोघांनी लखनौ सुपर जायंट्सची बेक्कार धुलाई केली.
अजिंक्य रहाणे ( १) व डॅरिल मिचेल ( १०) या दोन खेळाडूंना ४९ धावांवर माघारी पाठवताना LSG च्या लोकेश राहुल व दीपक हुडा यांनी अद्भुत झेल घेतले. पण, त्यांच्या या मेहनतीवर CSK चा कर्णधार ऋतुराजने पाणी फिरवले. रवींद्र जडेजा १९ चेंडूंत १७ धावांवर झेलबाद झाला. ऋतुराज दमदार फटकेबाजी करताना दिसला. ऋतुराजला रोखणे LSG ला अवघड होऊन बसले होते. CSK साठी सलामीवीर म्हणून २००० हून अधिक धावा करणारा ऋतुराज पहिला फलंदाज ठरला. शिवम दुबने १६ व्या षटकात सलग ३ उत्तुंग षटकार खेचून ऋतुसह २४ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ऋतुराजने पुढच्या षटकाची सुरूवात षटकाराने केली.