IPL 2024 मधून माघार, तरीही ऋतुराजला चिअर करण्यासाठी पोहोचला, CSK ने रचली चारोळी

कर्णधार ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad ) चेन्नई सुपर किंग्सला मजबूत स्थितीत राखले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 08:31 PM2024-04-23T20:31:36+5:302024-04-23T20:31:51+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live : Devon Conway is appreciating his best friend Ruturaj Gaikwad from the stands.  | IPL 2024 मधून माघार, तरीही ऋतुराजला चिअर करण्यासाठी पोहोचला, CSK ने रचली चारोळी

IPL 2024 मधून माघार, तरीही ऋतुराजला चिअर करण्यासाठी पोहोचला, CSK ने रचली चारोळी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live :  कर्णधार ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad ) चेन्नई सुपर किंग्सला मजबूत स्थितीत राखले आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये दोन धक्के देऊनही ऋतुराज मैदानावर उभा राहिला आणि त्याने अर्धशतक पूर्ण केले. त्याला चिअर करण्यासाठी परदेशातून खास मित्र मैदानावर आलेला दिसला, न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे याने दुखापतीमुळे आयपीएल २०२४ मधून माघार घेतली, परंतु तो आज चेपॉकवर CSK ला चिअर करताना दिसला. फ्रँचायझीने त्याच्यासाठी मस्त चारोळीही रचली... 

 KL Rahul चा अद्भुत कॅच! चेन्नई सुपर किंग्स सहाव्या चेंडूवर संकटात; पण, यश ठाकूरने केला घात


लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि पहिल्याच षटकात त्यांनी यजमानांना धक्का दिला. अजिंक्य रहाणेचा ( १) बॅड पॅच याही सामन्यात सुरू राहिला आणि मॅट हेनरीच्या पाचव्या चेंडूवर लोकेश राहुलने अद्भुत झेल घेतला. मोहसिन खानच्या दुसऱ्या षटकात LSG ला दुसरे यश मिळाले असते, परंतु यश ठाकूरने CSK च्या डॅरिल मिचेलचा सोपा झेल टाकला. ऋतुराज गायकवाड मनगटाचा चांगला वापर करताना गॅपमधून चौकार जोडत होता. रवी बिश्नोईच्या पहिल्याच षटकात ऋतुराजचाही झेल टाकला गेला. LSG च्या क्षेत्ररक्षकाकडून वारंवार चुका होताना दिसल्या. आयपीएल २०२४ मध्ये RR व GT ने सर्वाधिक १४ झेल टाकले आहेत. PBKS, DC, KKR आणि LSG यांनी प्रत्येकी ११ झेल सोडले आहेत.

Image
LSG कडून कॅच सुटताना दिसत असताना सहाव्या षटकात डॅरील मिचेलचा ( ११) अविश्वसनीय झेल दीपक हुडाने पकडला अन् चेपॉकला शांत केले. यश ठाकूरने ही विकेट मिळवून दिली. तिसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजाला थक्क करणारा चेंडू यशने टाकला होता. यशने पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात १ धाव देत १ विकेट घेतली आणि CSKला २ बाद ४९ धावा करता आल्या. शिवम दुबे फॉर्मात असतानाही सलग दुसऱ्या सामन्यात रवींद्र जडेजाला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा डाव कुणालाच कळत नव्हता. ऋतुराजने २८ चेंडूंत कर्णधार म्हणून तिसरे अर्धशतक पूर्ण केले आणि चेन्नईने १० षटकांत २ बाद ८५ धावा केल्या. 


Web Title: IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live : Devon Conway is appreciating his best friend Ruturaj Gaikwad from the stands. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.