IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live : चेपॉकचा आजचा सामना ऋतुराज गायकवाडच्या शतकाने गाजला असला तरी महेंद्रसिंग धोनीच ( MS Dhoni) नायक ठरला. आपल्या कारकीर्दितील शेवटची आयपीएल खेळणाऱ्या ( अशी चर्चा) धोनीला फलंदाजी करताना पाहण्यासाठी चाहते आतुरले होते. आजही शेवटच्या चेंडूवर त्याला स्ट्राईक मिळाली आणि त्याने चौकार खेचून चाहत्यांसाठी पैसा वसूल फटका खेचला. पण, चाहत्यांचे हे प्रेम धोनीची डोकेदुखी वाढवणारा ठरलेला आज दिसला आणि कॅप्टन कूलचा संयम सुटला.
ऋतु'राज'! CSK साठी शतक झळकावणारा पहिला कर्णधार; गायकवाड-शिवम दुबेने LSG ला चोपले
ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) याने चेपॉकचे मैदान गाजवताना शतक झळकावले. CSK साठी शतक झळकावणारा तो पहिलाच कर्णधार ठरला, तर हे त्याचे CSK साठी दुसरे शतक ठरले आणि त्याने रैना, मुरली विजय व वॉटसन यांच्याशी बरोबरी केली. अजिंक्य रहाणे ( १), डॅरिल मिचेल ( १०) व रवींद्र जडेजा ( १७) हे अपयशी ठरल्यानंतरही ऋतुराज व शिवम दुबे यांनी LSG समोर तगडे लक्ष्य उभे केले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४६ चेंडूंत १०४ धावा जोडल्या. शिवम २७ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकरांसह ६६ धावांवर रन आऊट झाला. ऋतुराज ६० चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह १०८ धावांवर नाबाद राहिला. शेवटचे दोन चेंडू शिल्लक असताना महेंद्रसिंग धोनी मैदानावर आला. धोनीने १ चेंडूंत चार धावा करून चेन्नईला ४ बाद २१० धावांपर्यंत पोहोचवले.
ऋतुराजच्या नाबाद १०८ धावा या चेन्नईकडून कर्णधार म्हणून सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने २०१९मध्ये RCB विरुद्ध नाबाद ८४ धावा केल्या होत्या. दरम्यान, शिवम दुबे व ऋतुराज चांगली फलंदाजी करत असताना कॅमेरामन वारंवार कॅमेरा धोनीकडे दाखवत होता आणि त्यामुळे चाहते जल्लोष करत होते. पण, त्यांचा हा जल्लोष मैदानावरील फलंदाजावर दडपण करणारा ठरतोय असे वाटल्याने धोनीचा संयम सुटला. त्याने कॅमेरामनच्या दिशेने बॉटल फेकण्याचा इशारा केला.
माहीने यंदाच्या पर्वात ७ सामन्यांत २५५.८८च्या स्ट्राईक रेटने ८७ धावा केल्या आहेत. त्यात त्याने ७ चौकार व ८ षटकार खेचले आहेत. शिवाय यष्टिंमागे पाच झेलही टिपले आहेत. एकूण धोनीने २५७ सामन्यांत ५१६९ धावा केल्या आहेत. त्यात २४ अर्धशतकांचा समावेश आहे. ३५६ चौकार व २४७ षटकार त्याने ठोकले आहेत. १४७ झेल व ४२ स्टम्पिंग त्याने केल्या आहेत.
Web Title: IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live : MS Dhoni gets angry at cameraman, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.