IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) याने चेन्नई सुपर किंग्ससाठी कर्णधार म्हणून पहिले शतक झळकावले. यंदाच्या पर्वातील ही त्याची तिसरी फिफ्टी+ धावांची खेळी ठरली. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध संकटात सापडलेल्या CSK ला ऋतुराजने सावरले.
अजिंक्य रहामए ( १) व डॅरिल मिचेल ( १०) या दोन खेळाडूंना ४९ धावांवर माघारी पाठवताना LSG च्या लोकेश राहुल व दीपक हुडा यांनी अद्भुत झेल घेतले. पण, त्यांच्या या मेहनतीवर CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाडने पाणी फिरवले. त्याने २८ चेंडूंत कर्णधार म्हणून तिसरे अर्धशतक पूर्ण. फॉर्मात असलेल्या शिवम दुबेच्या जागी सलग दुसऱ्या सामन्यात रवींद्र जडेजाला पुढच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले गेले. पण, मोहसिन खानने CSK ला तिसरा धक्का दिला. जडेजा १९ चेंडूंत १७ धावांवर झेलबाद झाला. ऋतुराज दमदार फटकेबाजी करताना दिसला.
ऋतुराजच्या फटक्यांमध्ये कोणतीच आक्रमकता नव्हती, तो त्याच्या मनगटाच्या जोरावर अगदी सहज चेंडू गॅपमधून सीमापार पाठवत होता. त्यामुळे त्याला नेमके रोखावे तरी कसे हेच लोकेशला समजत नव्हते. त्याने गोलंदाजीत बदल करूनही पाहिले, परंतु ऋतुराजला रोखणे LSG ला अवघड होऊन बसले होते. ऋतूने १५व्या षटकात त्याच्या डावातील पहिला षटकार खेचला. CSK साठी सलामीवीर म्हणून २००० हून अधिक धावा करणारा ऋतुराज पहिला फलंदाज ठरला. त्याने फॅफ ड्यू प्लेसिस ( १९६०), मुरली विजय ( १६६३) व मिचेल हसी ( १५६३) यांना मागे टाकले.
शिवम दुबने १६ व्या षटकात सलग ३ उत्तुंग षटकार खेचून ऋतुसह २४ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ऋतुराजने पुढच्या षटकाची सुरूवात षटकाराने केली. ऋतुराजने ५६ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि त्यात ११ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. शेन वॉटसन व मुरली विजय यांच्यानंतर चेन्नईसाठी दोन शतकं झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला.
Web Title: IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live : Ruturaj Gaikwad becomes the first CSK opener to complete 2000 runs in IPL, he hit century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.