IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीगच्या कामगिरीवर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा भारतीय संघ निवडला जाणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, आदी काही खेळाडूंचे स्थान पक्के आहे. पण, अष्टपैलू खेळाडू, मॅच फिनिशर आणि यष्टिरक्षक-फलंदाज अशा काही जागांसाठी कडवी स्पर्धा आहे. अशात सुरेश रैनाने ( Suresh Raina) चेन्नई सुपर किंग्सच्या एका खेळाडूसाठी थेट निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्याकडे अर्ज केला आहे.
MS Dhoni चा संयम सुटला, Live Match मध्ये बॉटल फेकून मारण्याचा इशारा केला, Video Viral
ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) हा CSK साठी शतक झळकावणारा पहिलाच कर्णधार ठरला. अजिंक्य रहाणे ( १), डॅरिल मिचेल ( १०) व रवींद्र जडेजा ( १७) हे अपयशी ठरल्यानंतरही ऋतुराज व शिवम दुबे यांनी LSG समोर तगडे लक्ष्य उभे केले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४६ चेंडूंत १०४ धावा जोडल्या. शिवम २७ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकरांसह ६६ धावांवर रन आऊट झाला. ऋतुराज ६० चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह १०८ धावांवर नाबाद राहिला. शेवटचे दोन चेंडू शिल्लक असताना महेंद्रसिंग धोनी मैदानावर आला. धोनीने १ चेंडूंत चार धावा करून चेन्नईला ४ बाद २१० धावांपर्यंत पोहोचवले. ऋतुराजच्या नाबाद १०८ धावा या चेन्नईकडून कर्णधार म्हणून सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने २०१९मध्ये RCB विरुद्ध नाबाद ८४ धावा केल्या होत्या.