IPL 2024, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा सामना करत आहेत. ९ सामन्यांत ५ विजय मिळवून १० गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत असलेल्या CSK ला हरवणे PBKS साठी तितके सोपे नक्की नसेल. पंजाब ९ सामन्यांत केवळ ३ विजय मिळवू शकला आहे आणि त्यांना उर्वरित पाचही सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात निवड जाहीर झाल्यानंतर शिवम दुबेचा हा पहिलाच आयपीएल सामना असणार आहे आणि त्यामुळे त्याच्याकडून धडाकेबाज खेळीची पुन्हा अपेक्षा आहे. CSK vs PBKS यांच्यात झालेल्या २८ सामन्यांपैकी चेन्नईने १५ मध्ये विजय मिळवला आहे.
Milestones Alert:
- शिवम दुबेने १ उत्तुंग षटकार खेचल्यास तो आयपीएलमध्ये षटकारांचे शतक पूर्ण करेल
- महेंद्रसिंग धोनीला आयपीएलमध्ये २५० षटकार पूर्ण करण्यासाठी ३ उत्तुंग फटके खेचावे लागतील
- जॉनी बेअरस्टोने पाच धावा करताच तो आयपीएलमध्ये १५०० धावा पूर्ण करेल
- डॅरिल मिचेल याला ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ४५०० धावा पूर्ण करण्यासाठी ५१ धावा हव्या आहेत
PBKS ने नाणेफेक जिंकून CSK ला प्रथम फलंदाजीला बोलावले... मागील ४ सामन्यांत पंजाबने चेन्नईविरुद्ध बाजी मारली आहे. तुषार देशपांडे व मथिशा पथिराणा यांच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये शार्दूल ठाकूर व रिचर्ड ग्लिसन आज दिसणार आहेत. PBKS च्या कागिसो रबाडा आणि सॅम कुरन यांनी चांगला मारा करताना CSK च्या ओपनर्सना जखडून ठेवले होते. पण, ऋतुराजने २० धावा करताच मोठा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार म्हणून एका पर्वात सर्वाधिक ४६२* धावा करण्याचा विक्रम ऋतुराजने नावावर केला. यापूर्वी २०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनीने ४६१ धावा केल्या होत्या आणि ११ वर्षांपूर्वीचा हा विक्रम आज ऋतूने मोडला.
Web Title: IPL 2024, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : HISTORY FOR Ruturaj Gaikwad! Most runs scored by a CSK captain in an IPL season, break MS Dhoni
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.