IPL 2024, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये बुधवारी चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले. CSK ला चेपॉकवर यंदाच्या पर्वात पराभूत करणारा PBSK हा दुसरा संघ ठरला. पंजाबचा हा १०व्या सामन्यातील चौथा विजय ठरला आणि त्यांनी स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखले. CSK १० सामन्यांत ५ विजयासह अजूनही चौथ्या क्रमांकावर आहे, परंतु त्यांना उर्वरित ४ पैकी ३ सामने जिंकावे लागतील. मात्र, दीपक चहरची दुखापत अन् मुस्ताफिजूर रहमानचे राष्ट्रीय कर्तव्य यामुळे चेन्नईचा पुढील प्रवास खडतर होईल, हे नक्की. त्यात तुषार देशपांडे आजारपणातून केव्हा बरा होतं, हेही त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral
PBKSच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. कागिसो रबाडा व सॅम कुरन यांनी पॉवर प्लेमध्ये चेन्नईवर दडपण टाकले होते. अर्शदीप सिंगची दोन षटकं वगळल्यास PBKS ची चांगली पकड दिसली. त्यानंतर हरप्रीत ब्रार ( २-१७) व राहुल चहर ( २-१६) यांनी फिरकीवर CSK ला जाळ्यात ओढले. ऋतुराज गायकवाडने खिंड लढवली आणि ४८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. आजच्या सामन्यातील महागडा गोलंदाज अर्शदीप ( १-५२) याने ऋतुराजची विकेट घेतली. अजिंक्य रहाणे ( २९), समीर रिझवी ( २१), मोईन अली ( १५) व महेंद्रसिंग धोनी ( १४) यांच्या हातभारामुळे चेन्नईने ७ बाद १६२ धावा केल्या.
CSK समोरील अडचणी कमी होताना नाही दिसल्या आणि पहिल्याच षटकात दोन चेंडू टाकून दीपक चहर दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. शार्दूल ठाकूरने ते षटक पूर्ण केले, परंतु पंजाबने १२ धावा जोडल्या. पदार्पण करणाऱ्या रिचर्ड ग्लीसनने पाच भन्नाट चेंडू टाकून पंजाबच्या जॉनी बेअरस्टोला दडपणात ठेवले आणि पुढच्याच षटकात त्याचे फळ मिळाले. ग्लीसनने त्याच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर प्रभसिमरन सिंगची ( १३) विकेट मिळवून दिली. रायली रुसोने पंजाबवरील दडपण कमी करताना चांगले फटके खेचले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड झालेल्या शिवम दुबेला अखेर गोलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने पहिल्याच षटकात जॉनी बेअरस्टोची ( ४६) विकेट मिळवली.
रुसो CSK च्या गोलंदाजांवर दडपण निर्माण केले होते आणि पंजाबला विजयी मार्गावर आणून बसवले. शार्दूलच्या फुलटॉसवर रुसो बोल्ड झाला. त्याने २३ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४३ धावा केल्या. शार्दूलच्या गोलंदाजीवर शशांक सिंगचा उत्तुंग झेल उडाला होता, परंतु डॅरिल मिचेलला प्रयत्न करूनही रिटर्न झेल नाही घेता आला. शशांक ( नाबाद २५ ) व सॅम कुरन ( नाबाद २६) यांनी पंजाबचा विजय सहज पक्का केला. पंजाबने १७.५ षटकांत ३ बाद १६३ धावा केल्या
Web Title: IPL 2024, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : PBKS beat CSK by 7 wickets, stay in play off race; check Point Table
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.