IPL 2024, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी चांगला मारा करताना चेन्नई सुपर किंग्सच्या धावांचा ओघ आटवला. शिवम दुबे व रवींद्र जडेजा हे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी सिलेक्ट झालेले खेळाडू अपयशी ठरले. फिरकीपटूंनी पंजाबला सामन्यावर मजबूत पकड मिळवून दिली. ऋतुराज गायकवाड शेवटपर्यंत उभा राहिला आणि अर्धशतकी खेळी करून आयपीएल २०२४ मधील ऑरेंज कॅप नावावर केली. विराट कोहलीला त्याने मागे टाकले.. चेन्नई सुपर किंग्ससाठी ३ पर्वात ५०० धावा करणारा ऋतुराज हा सुरेश रैनानंतर दुसरा फलंदाज ठरला.
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला
PBKS ने नाणेफेक जिंकून CSK ला प्रथम फलंदाजीला बोलावले. तुषार देशपांडे व मथिशा पथिराणा यांच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये शार्दूल ठाकूर व रिचर्ड ग्लिसन आज दिसणार आहेत. PBKS च्या कागिसो रबाडा आणि सॅम कुरन यांनी चांगला मारा करताना CSK च्या ओपनर्सना जखडून ठेवले होते. पण, ऋतुराज गायकवाड व अजिंक्य रहाणे यांनी अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर फटके खेचण्याचे लक्ष्य ठेवले. अर्शदीपच्या पहिल्या षटकात १० धावा चोपल्यानंतर पंजाबचा कर्णधार कुरनने त्याला विश्रांती दिली, परंतु पाचव्या षटकात पुन्हा अर्शदीपला १५ धावा चोपल्या. पॉवर प्लेच्या शेवटच्या षठकात अजिंक्यने आत्मविश्वासाने फटकेबाजी करून १९ धावा जोडल्या. CSK च्या पॉवर प्लेमध्ये ५५ धावा झाल्या.
अर्शदीपने टाकलेल्या २०व्या षटकात धोनीने १३ धावा चोपून चेन्नईला ७ बाद १६२ धावांपर्यंत पोहोचवले.