आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत असलेल्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपापला सलामीचा सामना जिंकला असून, आता दुसरा विजय मिळवून गुणतालिकेत आगेकूच करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांचे कर्णधार या हंगामात बदलले आहेत. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडे गेल्याने गुजरात टायटन्सचं नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं आहे. तर यंदाच्या आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्र सिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने चेन्नईचं कर्णधारपद युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आलं आहे. आता दोन तरुण कर्णधारांच्या नेतृत्वात खेळत असलेले आयपीएलमधील या दिग्गज संघांमध्ये बाजी कोण मारणार याबाबत उत्सुकता असेल.
या सामन्यासाठीचे दोन्ही संघ पुढील प्रमाणे आहेत.
चेन्नई सुपरकिंग्स - ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरेल मिचेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिझुर रहमान
गुजरात टायटन्स - रिद्धिमान साहा (यष्टिरक्षक), शुभमन गिल, अझमतुल्लाह उमरजई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवटिया, रशिद खान, साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेंसर जॉन्सन.