IPL 2024 CSK vs PBKS Live : आज चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होत आहे. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने अकरापैकी तब्बल १० वेळा नाणेफेक गमावली आहे. याबद्दल बोलताना मराठमोळ्या खेळाडूने मिश्लिक टिप्पणी केली. चेन्नईच्या संघात आजच्या सामन्यासाठी अखेर मिचेल सँटनरची एन्ट्री झाली आहे. ऋतुराज गायकवाडला पुन्हा एकदा नाणेफेक जिंकण्यात अपयश आले. (IPL 2024 News)
तो म्हणाला की, मी ११ पैकी दहा सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली... पण चांगली गोष्ट म्हणजे मी केवळ एकदा नाणेफेक जिंकली असताना आम्ही पाच सामन्यात विजय मिळवला आहे. खरं तर २०१२ च्या हंगामात चेन्नईचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या विरोधात १२ वेळा नाणेफेकीचा कौल आला होता. पण तरी देखील चेन्नईने अंतिम सामना खेळला होता.
चेन्नईचा संघ -ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे.
पंजाबचा संघ -सॅम करन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, राइली रूसो, शशांक सिंग, जितेश शर्मा, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंग.