Join us  

चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

CSK ने हा विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 7:07 PM

Open in App

IPL 2024, CSK vs RR Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील घरच्या मैदानावरील शेवटच्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. CSK ने हा विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ( RCB) टेंशन वाढवले आहे. सिमरजीत सिंगने ३ व तुषार देशपांडेने २ विकेट्स घेत RR ला कमी धावांत रोखले, ते लक्ष्य CSK च्या फलंदाजांनी सहज पार केले. Point Table मध्ये CSK १३ सामन्यांत १४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर सरकले आहेत. 

रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video

CSK च्या गोलंदाजांनी RR विरुद्ध चांगला मारा केला. सिमरजीत सिंगने तीन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. जॉस बटलर ( २१), यशस्वी जैस्वाल (२४ ) व  संजू सॅमसन ( १५) यांना त्याने बाद केले. संजू व रियान यांची ४२ धावांची भागीदारी सिमरजीतने तोडली. ध्रुव जुरेल  ( २८) आणि रियान यांनी ४० धावा जोडल्या. रियानने ३५ चेंडूंत ४७ धावा करून संघाला ५ बाद १४१ धावापर्यंत पोहोचवले. तुषार देशपांडेने २ विकेट्स घेतल्या.

राचिन रवींद्र ( २७) व डॅरिल मिचेल ( २२) हे कर्णधार ऋतुराज गायकवाडसह अनुक्रमे ३२ व ३५ धावांचे योगदान देऊन माघारी परतले. मोईन अली ( १०), शिवम दुबे ( १८) व  रवींद्र जडेजा ( ५) माघारी परतले, परंतु कर्णधार गायकवाड मैदानावर उभा राहिला. जडेजाला obstructing the field नियमानुसार बाद दिले गेले. ऋतुराजने नाबाद ४२ धावा करून संघाचा विजय पक्का केला. समीर रिझवीने नाबाद १५ धावा केल्या. चेन्नईने १८.२ षटकांत ५ बाद १४५ धावा करून सामना जिंकला. 

 

टॅग्स :आयपीएल २०२४चेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्सऋतुराज गायकवाड