रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video

रवींद्र जडेजाची ( Ravindra Jadeja) घाई त्यांना अडचणीत आणणारी ठरू शकते

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 06:59 PM2024-05-12T18:59:00+5:302024-05-12T18:59:40+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, CSK vs RR Live Marathi : RAVINDRA JADEJA GIVEN OUT OBSTRUCTING THE FIELD, third umpire reckons Jadeja knew where the ball was, and that he turned into the line of the throw, Video | रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video

रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, CSK vs RR Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, परंतु रवींद्र जडेजाची ( Ravindra Jadeja) घाई त्यांना अडचणीत आणणारी ठरू शकते. राजस्थान रॉयल्सला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. 


CSK च्या गोलंदाजांनी RR विरुद्ध चांगला मारा केला. सिमरजीत सिंगने राजस्थानच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी पाठवले. जॉस बटलर ( २१) व यशस्वी जैस्वाल (२४ ) यांच्या अपयशानंतर चेन्नईच्या अन्य गोलंदाजांनी पाहुण्यांना दबावात ठेवले. कर्णधार संजू सॅमसनही ( १५) सिमरजीतच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. चेन्नईच्या गोलंदाजाने ४ षटकांत २४ धावांत तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. संजू व रियान यांची ४२ धावांची भागीदारी सिमरजीतने तोडली. ध्रुव जुरेल  ( २८) आणि रियान यांनी ४० धावा जोडल्या. रियानने ३५ चेंडूंत ४७ धावा करून संघाला ५ बाद १४१ धावापर्यंत पोहोचवले. तुषार देशपांडेने २ विकेट्स घेतल्या.
राचिन रवींद्रने ( २७) चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु आर अश्विनने चौथ्या षटकात RR ला त्याची विकेट मिळवून दिली. ऋतुराज गायकवाडसह त्याने ३२ धावांची भागीदारी केली होती. ऋतुराज व डॅऱिल मिचेल यांनीही ३५ धावा जोडल्या, परंतु युझवेंद्र चहलने पहिल्याच षटकात मिचेलला ( २२) बाद केले. नांद्रे बर्गरने १२व्या षटकात मोईन अलीला ( १०) माघारी पाठवून सामन्यात रंगत आणली. शिवम दुबे १८ धावा करून आर अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. चेन्नईला ३६ चेंडूंत ३५ धावा हव्या होत्या. नशीबही CSK च्या बाजूने होता, म्हणून ऋतुराज दोनवेळा रन आऊट होता होता वाचला.


१६व्या षटकात दुसरी धाव घेताना रवींद्र जडेजाने ( ५) संजू सॅमसनच्या थ्रोमध्ये अडथळा निर्माण केला आणि त्यामुळे त्याला obstructing the field नियमानुसार बाद दिले गेले. जडेजा या निर्णयावर नाखूश दिसला, पण अम्पायरचा निर्णय अंतिम ठरला. दुसरी धाव घेण्यासाठी जडेजा पळाला, परंतु ऋतुराजने त्याला माघारी पाठवले. तोपर्यंत चेंडू संजूकडे आला होता आणि त्याने लगेच जडेजाला बाद करण्यासाठी नॉन स्ट्राईकर एंडला थ्रो केला. संजू चेंडू टाकतोय हे जडेजाने पाहिले होते आणि तो यष्टींच्या समोरून पळाला आणि तिसऱ्या अम्पायरने त्याची हिच चोरी पकडली आणि त्याला बाद दिले. 

 



Web Title: IPL 2024, CSK vs RR Live Marathi : RAVINDRA JADEJA GIVEN OUT OBSTRUCTING THE FIELD, third umpire reckons Jadeja knew where the ball was, and that he turned into the line of the throw, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.