सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 

CSK च्या गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्सला चांगलेच जखडून ठेवले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 05:06 PM2024-05-12T17:06:06+5:302024-05-12T17:12:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, CSK vs RR Live Marathi : SIMARJEET SINGH take 3 important wickets, Chennai Super Kings needs 142 runs to have a chance in the Play-offs | सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 

सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, CSK vs RR Live Marathi : एमए चिदंबरम स्टेडियमवर चाहते आज फक्त आणि फक्त महेंद्रसिंग धोनीसाठी आले आहेत... चेन्नई सुपर किंग्सचा चेपॉकवरील हा शेवटचा साखळी सामना आहे... जर CSK प्ले ऑफमध्ये पात्र ठरले तर ते पुन्हा चेपॉकवर खेळतील, पण तसे न झाल्यास MS Dhoni ला घरच्या मैदानावर शेवटचं खेळताना पाहण्याची संधी कोणालाच सोडायची नव्हती. CSK च्या गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्सला चांगलेच जखडून ठेवले होते. कर्णधार संजू सॅमसन व रियान पराग यांच्या भागीदारीमुळे RR ला सन्मानजनक धावा उभ्या करता आल्या. ध्रुव जुरेलनेही हातभार लावला.  


RR ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यशस्वी जैस्वाल व जॉस बटलर यांनी सावध सुरुवात केली. पहिली ४ षटकं आरामात खेळून काढल्यानंतर पाचव्या षटकात यशस्वीने हात मोकळे केले. RR ला पहिल्या सहा षटकांत ४२ धावा करता आल्या. सातव्या षटकात सिमरजीत सिंगने तिसऱ्या चेंडूवर यशस्वीला ( २४) ऋतुराज गायकवाडकरवी झेलबाद केले. सिमरजीतने त्याच्या पुढच्या षटकात बटलरला ( २१) माघारी पाठवले. RR चा फलंदाजाचा तुषार देशपांडेने अप्रितम झेल घेतला. 


रवींद्र जडेजाच्या चेंडूवर रियान परागने रिव्हर्स स्वीप मारला अन् चेंडू महिशा तीक्षणाच्या हाती विसावला होता, परंतु तीन वेळा प्रयत्न करूनही CSK च्या खेळाडूला झेल पकडता नाही आला. CSK च्या गोलंदाजांचा उत्तम मारा सुरू होता आणि RRचे फलंदाज धावांसाठी चाचपडत होते. जडेजाने त्याच्या ४ षटकांत २४ धावा दिल्या. संजू व रियान यांची ४२ धावांची भागीदारी सिमरजीतने तोडली. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात संजू १५ धावांवर माघारी परतला.  राजस्थानच्या १५ षटकांत ३ बाद ९४ धावाच झाल्या होत्या. सिमरजीतने २४ धावा देताना ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

रियान व ध्रुव जुरेल यांनी राजस्थानाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. २०व्या षटकात तुषारने जुरेलला  ( २८) झेलबाद करून रियानसोबत त्याची ४० धावांची भागीदारी तोडली.  पुढच्याच चेंडूवर शुभम दुबे ( ०) शिवम दुबेच्या हाती झेल देऊन परतला. आर अश्विनने १ धाव घेत तुषारची हॅटट्रिक होऊ दिली नाही. रियानने ३५ चेंडूंत ४७ धावा करून संघाला ५ बाद १४१ धावापर्यंत पोहोचवले. 

Web Title: IPL 2024, CSK vs RR Live Marathi : SIMARJEET SINGH take 3 important wickets, Chennai Super Kings needs 142 runs to have a chance in the Play-offs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.