IPL 2024 CSK vs SRH Live Match Updates In Marathi | चेन्नई : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ४६ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आहेत. पाहुण्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने स्फोटक खेळी केली, त्याचे थोडक्यात शतक हुकले. ऋतुराजने ९८ धावा करून हैदराबादसमोर २१३ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. (IPL 2024 News)
ऋतुराजने ३ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ५४ चेंडूत ९८ धावांची खेळी केली. त्याला डेरिल मिचेलने चांगली साथ देत ५२ धावा कुटल्या. अखेर चेन्नईने निर्धारित २० षटकांत ३ बाद २१२ धावा करून हैदराबादला विजयासाठी २१३ धावांचे आव्हान दिले.
चेन्नईला अजिंक्य रहाणेच्या (९) रूपात सुरुवातीलाच एक मोठा झटका बसला. त्यानंतर ऋतुराज आणि डेरिल यांनी मोर्चा सांभाळत मोठी भागीदारी नोंदवली. मग शिवम दुबेने २० चेंडूत ३९ धावांची स्फोटक खेळी केली. नेहमीप्रमाणे महेंद्रसिंग धोनीने फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्याला २ चेंडूत ५ धावा करता आल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि जयदेव उनाडकट यांना प्रत्येकी १-१ बळी घेता आला.
चेन्नईचा संघ -
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीक्क्षा पथिराना.
हैदराबादचा संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.
Web Title: IPL 2024 CSK vs SRH Live Match Updates In Marathi Chennai Super Kings set Sunrisers Hyderabad a target of 213 to win, with Rituraj Gaikwad scoring 98 and Daryl Mitchell scoring 52
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.