IPL 2024 CSK vs SRH Live Match Updates In Marathi | चेन्नई: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचा भाग आहे. इम्पॅक्ट प्लेअरमुळे दुबेला गोलंदाजी पुरेशी संधी मिळत नसली तरी त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. हैदराबादविरूद्धच्या सामन्यात देखील याचा प्रत्यय आला. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ४६ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आहेत. पाहुण्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने स्फोटक खेळी केली, त्याचे थोडक्यात शतक हुकले. ऋतुराजने ९८ धावा करून हैदराबादसमोर २१३ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. (IPL 2024 News) ऋतुराजने ३ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ५४ चेंडूत ९८ धावांची खेळी केली. त्याला डेरिल मिचेलने चांगली साथ देत ५२ धावा कुटल्या. अखेर चेन्नईने निर्धारित २० षटकांत ३ बाद २१२ धावा करून हैदराबादला विजयासाठी २१३ धावांचे आव्हान दिले. दुबेची स्फोटक खेळी पाहून माजी खेळाडू इरफान पठाणने त्याला भारताच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या संघात घ्यायलाच हवे असे मत मांडले. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही प्रतिक्रिया दिली.
हैदराबादविरूद्धच्या सामन्यात शिवम दुबेने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळताना चांगली कामगिरी केली. त्याने ४ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने २० चेंडूत ३९ धावा कुटल्या. चेन्नईला अजिंक्य रहाणेच्या (९) रूपात सुरुवातीलाच एक मोठा झटका बसला. त्यानंतर ऋतुराज आणि डेरिल यांनी मोर्चा सांभाळत मोठी भागीदारी नोंदवली. मग शिवम दुबेने २० चेंडूत ३९ धावांची स्फोटक खेळी केली. नेहमीप्रमाणे महेंद्रसिंग धोनीने फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्याला २ चेंडूत ५ धावा करता आल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि जयदेव उनाडकट यांना प्रत्येकी १-१ बळी घेता आला.
Web Title: IPL 2024 CSK vs SRH Live Match Updates In Marathi Shivam Dube must get a place in Team India for T20 World Cup, says former player Irfan Pathan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.