Join us  

IPL 2024 साठी SRH ची रणनीती; पॅट कमिन्स करणार नेतृत्व, स्टेनबद्दल मोठी अपडेट

आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 5:06 PM

Open in App

ipl 2024 schedule: आयपीएलचा आगामी हंगाम सर्व दहा संघांसाठी खास असणार आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले आहे. सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने असणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या काही सामन्यांचे फक्त वेळापत्रक समोर आले आहे. आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादचा संघ एका नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात दिसण्याची दाट शक्यता आहे. आयपीएलच्या मिनी लिलावात सनरायझर्सच्या फ्रँचायझीने २० कोटींहून अधिक रूपये खर्च करून ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला आपल्या ताफ्यात घेतले.

मागील वर्षात पॅट कमिन्सने अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली. त्याच्यामध्ये असलेली नेतृत्व क्षमता ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा जग्गजेता बनवून गेली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. त्यामुळेच कमिन्सवर लिलावात विक्रमी बोली लागली. अशातच आता हैदराबादची फ्रँचायझी त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवणार असल्याचे कळते. 

कमिन्सवर मोठी जबाबदारीसनरायझर्स हैदराबादची फ्रँचायझी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज डेल स्टेनला प्रशिक्षक म्हणून काही काळ विश्रांती देऊ शकते. तर कर्णधारपदी पॅट कमिन्सची वर्णी लागू शकते, अशी माहिती क्रिकबजने दिली. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला खरेदी करण्यासाठी काही फ्रँचायझींमध्ये चुरस झाली. पण, सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजत कमिन्सला २०.५० कोटीत आपल्या संघात घेतले. 

दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ची तारीख जाहीर झाली आहे. यंदा आयपीएलनंतर लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे, शिवाय लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल नेमकी कुठे खेळवायची हाही प्रश्न होता. पण, याचे उत्तर मिळाले आहे. आयपीएल २०२४ ला २२ मार्चपासून सुरू होणार आहे आणि पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांनंतर पुढील वेळापत्रक जाहीर केले जाईल. 

IPL 2024 वेळापत्रक

२२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई२३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली२३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता२४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर२४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद२५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू२६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई२७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद२८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर२९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम१ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई२ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ

 

टॅग्स :आयपीएल २०२३सनरायझर्स हैदराबाद