IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने गेल्या काही हंगामात संघर्ष केला आहे. आयपीएल २०२३ मध्ये १४ सामन्यांतून फक्त ४ विजय मिळवून ते तळाशी राहिले. एडन मार्करामच्या नेतृत्वाखालील संघ या वर्षी स्पर्धेदरम्यान अन्य संघांच्या तुलनेत कुठेच खरा उतरला नाही. संघात काही मोठी नावे असूनही त्यांच्याकडे फायर पॉवरची कमतरता होती. पण, आता आयपीएल २०२४ साठी संघाने कंबर कसली आहे. SRHने सोमवारी मुख्य प्रशिक्षक ब्रायन लारा यांचा करार संपुष्टात आणला असून RCBच्या माजी खेळाडूकडे ही जबाबदारी सोपवली आहे.
टॉम मुडी यांच्यानंतर २०२३ मध्ये लाराकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, परंतु आयपीएल २०२१ व २०२२ प्रमाणे संघाला यंदाही तळाला समाधान मानावे लागले. त्याच्या जागी न्यूझीलंडचा व RCBचा माजी खेळाडू डॅनिएल व्हिटोरी याच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली गेली होती. व्हिटोरी यापूर्वी २०१४ ते २०१८ या कालवाधीत RCBचा कोच होता आणि त्याने नुकतीच ऑस्ट्रेलियाच्या संघाचे साहाय्यक प्रशिक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे.
व्हिटोरीने ११३ कसोटी सामन्यांत ४५३१ धावा केल्या आणि ३६२ विकेट्स घेतल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २९५ सामन्यांत २२५३ धावा व ३०५ विकेट्स आहेत. एकूण ४३ ट्वेंटी-२० सामन्यांत १०४१ धावा व १३१ विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
- RCB ने मुख्य प्रशिक्षक म्हणून अँडी फ्लॉवर यांची निवड
- लखनौ सुपर जायंट्सने जस्टीन लँगर याची मुख्य प्रशिक्षकपदी निवड
Web Title: IPL 2024 : Daniel Vettori appointed as the new head coach of Sunrisers Hyderabad for IPL 2024, Brian Lara part-way
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.