David Warner vs SRH, IPL 2024 Auction : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी आज मिनी लिलाव पार पडला. या लिलावात सनरायझर्स हैदराबादने ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजयात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या पॅट कमिन्स आणि ट्रेव्हिस हेड या दोघांना खरेदी केले. या दोघांचे अभिनंदन करण्यासाठी ऑस्ट्रेलियन सलामीवीर आणि SRHचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने पोस्ट केली. त्यावेळी त्याला एक विचित्र बाब दिसून आली. डेव्हिड वॉर्नरला Instagram आणि X (पूर्वीचे Twitter) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर SRH ने ब्लॉक केले असल्याचे त्याला समजले. त्यानंतर वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ही माहिती दिली.
दुबईमध्ये झालेल्या IPL 2024 च्या लिलावात हैदराबादने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला २०.५ कोटींना आणि ट्रेव्हिस हेडला ६.८ कोटींना खरेदी केले. फ्रेंचायझीने त्यांच्या इन्स्टा स्टोरीमध्ये दोघांचे छायाचित्र पोस्ट केले आहे, जे ट्रेव्हिस हेडने रिशेअर केले. वॉर्नरला त्याच्या स्टोरीसह हेडची इन्स्टा स्टोरी शेअर करायची होती, पण हैदराबादने त्याला ब्लॉक केल्यामुळे तो तसे करू शकला नाही.
2014 च्या आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर वॉर्नरला हैदराबादने विकत घेतले होते. यानंतर त्याला 2015 मध्ये कर्णधारपद देण्यात आले. वॉर्नरने हैदराबादचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले आणि त्याच्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. त्या मोसमात त्याने ८४८ धावाही केल्या होत्या. बॉल टॅम्परिंग प्रकरणातील त्याच्या सहभागामुळे, हैदराबादने वॉर्नरकडून कर्णधारपद हिसकावून घेतले होते आणि IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी त्याला रिलीज केले. तेव्हापासून वॉर्नर विरूद्ध SRH हा संघर्ष कायमच पाहण्यासारखा असतो.
डेव्हिड वॉर्नर सध्या दिल्ली संघाकडून खेळतो. संघाला चॅम्पियन बनवणाऱ्या कर्णधाराला रोखण्यासाठी SRH च्या या वृत्तीवर सोशल मीडिया वापरकर्ते प्रचंड संतापले आहेत आणि फ्रेंचायझीवर टीका करताना दिसत आहेत.
Web Title: IPL 2024 David Warner blocked by Sunrisers Hyderabad stormy criticism on social media Kavya Maran
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.