Join us  

नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी

अभिषेक पोरेल व शे होप यांच्या फटकेबाजीने दिल्ली कॅपिटल्सला सामन्यात मजबूत स्थितीत आणले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 9:18 PM

Open in App

IPL 2024, DC vs LSG Live Marathi : अभिषेक पोरेल व शे होप यांच्या फटकेबाजीने दिल्ली कॅपिटल्सला सामन्यात मजबूत स्थितीत आणले. लखनौ सुपर जायंट्सने पहिल्याच षटकात जॅक फ्रेझर मॅकगर्कला बाद केले, परंतु अभिषेक व होप यांनी ९२ धावांची भागीदारी केली. LSG च्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत DC च्या धावगतीवर वेसण घातले होते. पण, रिषभ पंत व त्रिस्तान स्तब्स यांनी शेवटच्या षटकांत फटकेबाजी करून DC ला सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचवले. स्तब्सनेही अर्धशतक झळकावताना मैदान गाजवले. 

KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video

LSG कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच षटकात धोकादायक जॅक फ्रेझर-मॅकगर्क ( ०) याला अर्शद खानने बाद केले. पण, अभिषेक पोरेल आणि शे होप यांनी वादळी फटकेबाजी केली. अभिषेकने २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रवी बिश्नोईने ४९ चेंडूंत ९२ धावांची ही भागीदारी तोडली आणि होप ३८ धावांवर झेलबाद झाला. लोकेश राहुलने अफलातून झेल टिपला. या विकेटनंतर DC च्या धावांचा वेग थोडा मंदावला आणि त्याचे दडपण अभिषेकवर आले. नवीन उल हकच्या चेंडूवर पूल मारण्याच्या प्रयत्नात तो निकोलस पूरनच्या हाती झेल देऊन परतला. अभिषेकने ३३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ५८ धावा केल्या.   सेट फलंदाज माघारी परतल्याने दिल्लीची सरासरी कमी झाली आणि त्यांना ८ ते १३ या पाच षटकांत २ बाद ३३ धावाच करता आल्या. बिश्नोईने ४ षटकांत २६ धावा देत १ विकेट घेतली. बिश्नोईची षटकं संपल्यानंतर रिषभ पंतने हात मोकळे करण्यास सुरुवात केली. १५ षटकांत दिल्लीने ३ बाद १३६ धावा चढवल्या होत्या. रिषभवर सर्व आशा होत्या, पंरतु त्याच्या हातातून बॅट सातत्याने सुटताना दिसली. १७व्या षटकात नवीनच्या गोलंदाजीवर रिषभने मारलेला ( ३३) फटका दीपक हुडाच्या हाती विसावला. त्याने स्तब्ससह ४७ धावा जोडल्या. स्तब्सने २२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 

२०व्या षटकात रवी बिश्नोईने दोन झेल टाकले. अक्षर पटेलनेही नाबाद १४ धावा केल्या आणि स्तब्स २५ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारासह ५७ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीने ४ बाद २०८ धावा केल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२४दिल्ली कॅपिटल्सलखनौ सुपर जायंट्सरिषभ पंत