दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले

दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील अखेरच्या साखळी सामन्यांत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 11:22 PM2024-05-14T23:22:31+5:302024-05-14T23:25:25+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, DC vs LSG Live Marathi : Delhi Capitals beat Lucknow Super Giants & Rajasthan Royals book their place in the playoffs | दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले

दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, DC vs LSG Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील अखेरच्या साखळी सामन्यांत विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या या विजयाने DC ने स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखले, परंतु त्याचवेळी त्यांनी राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के केले. RR १२ सामन्यांत १६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि DC ने विजय मिळवल्याने LSG लाही १६ गुणांपर्यंत जाण्यापासून रोखले. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्स हे दोनच संघ जे १६ गुणांपर्यंत पोहोचणारे संघ राहिले आहेत. 


इशांत शर्माने पाचव्या चेंडूवर स्लोवरवन वर लोकेश राहुलला ( ५) चकवले आणि मुकेश कुमारने अप्रतिम परतीचा झेल टिपला. तिसऱ्या षटकात इशांतच्या गोलंदाजीवर क्विंटन डी कॉकचा झेल खलीलने टाकला. पण, पुन्हा एकदा इशांच्या गोलंदाजीवर मुकेशने झेल टिपला आणि क्विंटनला १२ धावांवर बाद केले. LSG ची पडझड सुरू राहिली आणि अक्षर पटेलने चौथ्या षटकात मार्कस स्टॉयनिसला ( ५) यष्टिचीत केले.  पण, निकोलस पूरनने पुढील चेंडूंवर ४,६,४,६ असे फटके खेचून LSG वरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. इशांत थांबायचं नाव घेत नव्हता आणि पुढच्या षटकात त्याने दीपक हुडाला पायचीत करून DC ला चौथे यश मिळवून दिले.
 


फलंदाजीत कमाल केल्यानंतर त्रिस्तान स्तब्सने त्याच्या पहिल्या षटकात आयुष बदोनीला ( ६) गुलबदीन नैबच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. लखनौचा निम्मा संघ ७१ धावांवर तंबूत परतला. पुरनने २१ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि संघाला १० षटकांत ५ बाद ९७ धावांपर्यंत पोहोचवले. मुकेश कुमारने १२व्या षटकात दिल्लीला मोठी विकेट मिळवून दिली. २७ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारासह ६१ धावा करणाऱ्या निकोलसचा अफलातून झेल अक्षर पटेलने टिपला. कृणाल पांड्या ( १८) व अर्शद खान यांनी संघर्ष सुरू ठेवला होता, परंतु कुलदीप यादवने ही जोडी तोडली. युधवीर सिंग ( १४) बाद झाला. अर्शदने २५ चेंडूंत अर्धशतक झळकावताना सामन्यातील चुरस कायम राखली होती. 

१२ चेंडूंत २९ धावा LSG ला हव्या होत्या आणि अर्शद हिच त्यांची आशा होता. १९व्या षटकात रवी बिश्नोई अर्शदला स्ट्राईक देण्यासाठी रन आऊट झाला. या विकेटमुळे लखनौवर दडपण आले आणि ६ चेंडूत २३ धावा असा सामना अटीतटीचा झाला. अर्शदने ३३ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ५८ धावा केल्या. लखनौला ९ बाद १८९ धावाच करता आल्या आणि दिल्लीने १९ धावांनी सामना जिंकला. दिल्ली १४ गुणांवर पोहोचले खरे, परंतु त्यांचा नेट रन रेट हा वजा मध्येच राहिला. त्यामुळे CSK vs RCB या सामन्याचे महत्त्व वाढले. 


तत्पूर्वी, LSG ला स्फोटक जॅक फ्रेझर मॅकगर्कला ( ०) शांत ठेवण्यात यश आले असले तरी अभिषेक पोरेल व शे होप यांच्या फटकेबाजीने संघाला मजबूत स्थितीत आणले. दोघांनी ९२ धावांची भागीदारी केली. LSG च्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत DC च्या धावगतीवर वेसण घातले होते. पण, रिषभ पंत व त्रिस्तान स्तब्स यांनी शेवटच्या षटकांत फटकेबाजी करून DC ला सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचवले. होपने ३८ धावा केल्या, तर अभिषेकने ३३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ५८ धावा चोपल्या. रिषभच्या ३३ आणि अक्षर पटेलच्या १४ धावांच्या योगदानांनी संघाला मजबूती दिली. त्रिस्तान स्तब्सने २५ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारासह ५७ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीने ४ बाद २०८ धावा केल्या. 
 

Web Title: IPL 2024, DC vs LSG Live Marathi : Delhi Capitals beat Lucknow Super Giants & Rajasthan Royals book their place in the playoffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.