Join us  

KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video

DC साठी हा सामना नॉक आऊटसारखा आहे, पराभव त्यांना स्पर्धेबाहेर फेकेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 8:29 PM

Open in App

IPL 2024, DC vs LSG Live Marathi : दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला टीकवण्यासाठी खेळणार आहेत. DC साठी हा सामना नॉक आऊटसारखा आहे, पराभव त्यांना स्पर्धेबाहेर फेकेल. पण, जिंकूनही त्यांचे गणित हे इतरांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. LSG ने १२ सामन्यांत १२ गुण कमावले आहेत आणि त्यांना उर्वरित दोन्ही लढती जिंकून १६ गुणांसह प्ले ऑफमध्ये पोहोचता येईल. LSG कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  

प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक ठरणाऱ्या जॅक फ्रेझर-मॅकगर्कला LSG ने सापळा रचून माघारी पाठवले. अर्शद खानने दुसऱ्याच चेंडूवर जॅकला ( ०) लाँग ऑनवर झेल देण्यास भाग पाडून बाद केले. पण, अभिषेक पोरेने उत्तुंग फटके खेचून DC वरील दडपण कमी केले. मॅकगर्कची उणीव पोरेल भरून काढताना दिसला आणि अर्शदच्या दुसऱ्या षटकात त्याने ४,४,६,४ असे खणखणीत फटके खेचले. शे होपही या पार्टीत सामील झाला आणि चौथ्या षटकात त्याने ४,४,६,२ अशी फलंदाजी केली. अभिषेक व होप यांनी ३४ चेंडूंत ७१ धावा कुटून संघाला पहिल्या पॉवर प्लेमध्ये १ बाद ७३ धावांपर्यंत पोहोचवले. अभिषेकने २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. DC कडून वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीयांमध्ये अभिषेक तिसरा ठरला. त्याने विरेंद्र सेहवागशी ( २१ चेंडू वि. RR, २०१०) बरोबरी केली. रिषभ पंत ( वि. मुंबई, २०१९) आणि पृथ्वी शॉ ( वि. कोलकाता, २०२१) यांनी १८ चेंडूंत, तर वीरूने ( वि. राजस्थान, २०१२) २० चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.  

रवी बिश्नोईने ४९ चेंडूंत ९२ धावांची ही भागीदारी तोडली आणि होप ३८ धावांवर झेलबाद झाला. लोकेश राहुलने अफलातून झेल टिपला. पहिल्या प्रयत्नात कव्हर्सवर लोकेशच्या हातून झेल सुटला होता, परंतु त्याने लगेच डाईव्ह घेत दुसऱ्या प्रयत्न यशस्वी केला अन् LSG ला ही विकेट मिळवून दिली. काही दिवसांपूर्वी फ्रँचायझी मालक संजीव गोएंका लोकेशवर नाराज झाले होते, परंतु त्याचा हा झेल पाहून ते टाळ्या वाजवताना दिसले. 

टॅग्स :आयपीएल २०२४लोकेश राहुललखनौ सुपर जायंट्सदिल्ली कॅपिटल्स