आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पाच सामन्यात फक्त एक विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने दिल्लीचं मैदान गाजवत स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्यात शर्माजी का बेटा मॅच विनर ठरला. मोक्याच्या क्षणी सामना हातून निसटत असताना इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात रोहित शर्माच्या जागी आलेल्या कर्ण शर्मानं आपल्या फिरकीची जादू दाखवली. कर्ण शर्मानं आधी अभिषेक पोरेल आणि करूण नायर यांची सेट झालेली जोडी फोडली. करुण नायरच्या साथीनं शतकी भागीदारी रचणाऱ्या अभिषेक पोरेल याला त्याने तंबूचा रस्ता दाखवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कर्ण शर्माचा इम्पॅक्ट, सामनावीर पुरस्कारही मिळवला, पण..
अभिषेक पोरेलची विकेट मिळाली म्हणजे मॅच मुंबई इंडियन्सकडे आली असे अजिबात नव्हते. कारण कमालीच्या फॉर्ममध्ये असलेला लोकेश राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स ही जोडी मैदानात होती. यापैकी एकजण जरी टिकला असता तर मुंबई इंडियन्सचं काही खरं नव्हते. पण कर्ण शर्मानं या दोघांचीही विकेट घेतली. रोहित शर्माच्या जागी इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात येऊन त्याने खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या ३ विकेट्स घेत इम्पॅक्ट टाकला. ४ षटकात ३६ धावा खर्च करून ३ विकेट्स घेणाऱ्या कर्ण शर्मालाच सामनावीरचा पुरस्कारही मिळाला. "शर्माजी का बेटा मॅच विनर" ठरला. पण रोहित शर्मानंही हा सामना जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने डगआउटमध्ये बसून सामना फिरवल्याची चर्चा रंगत आहे.
रोहित शर्मानं डगआउटमध्ये बसून असं काय केलं?
दिल्ली कॅपिटल्सच्या धावफलकावर २ बाद ११९ धावा असताना मुंबई इंडियन्सचा संघ या सामन्यात मागे पडला होता. १२ व्या षटकात दव फॅक्टरमुळे नव्या नियमानुसार मुंबई इंडियन्सच्या संघाने नव्या चेंडूची मागणी केली. अंपायर्संनीही ती मान्य केली. त्यानंतर ड्रेसिंग रुममधून रोहित शर्मानं फिरकी गोलंदाजाकडून गोलंदाजी करण्याचा इशारा केला. हार्दिक पांड्यानंही माजी कर्णधाराचा सल्ला मनावर घेतला अन् मग कर्णध शर्मानं लोकेश राहुल आणि ट्रिस्टन्स स्टब्स यांची विकेट घेतली. जी सामन्याचा टर्निंग पाँइंट ठरली. रोहित फलंदाजीत अपयशी ठरत असला तरी कॅप्टन नसतानाही तो खास डावपेच आखत मुंबई इंडियन्सला मदत करताना दिसला. त्याचा रिझल्टही पाहायला मिळाला, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे.