IPL 2024: पराभवामुळे बंगळुरू संघातील गोलंदाजांच्या मर्यादा उघड

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) अवघ्या तीन सामन्यांच्या आधारे कोणत्याही संघाबाबत मत मांडणे कठीण आहे. पण, बंगळुरूच्या (Royal Challengers Bangalore) गोलंदाजीत विविधता नसल्यामुळे यंदाचा हंगाम या संघासाठी दमछाक करणारा ठरणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 08:56 AM2024-03-31T08:56:07+5:302024-03-31T08:56:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024: Defeat reveals limitations of royal challengers bangalore team's bowlers | IPL 2024: पराभवामुळे बंगळुरू संघातील गोलंदाजांच्या मर्यादा उघड

IPL 2024: पराभवामुळे बंगळुरू संघातील गोलंदाजांच्या मर्यादा उघड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू - इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) अवघ्या तीन सामन्यांच्या आधारे कोणत्याही संघाबाबत मत मांडणे कठीण आहे. पण, बंगळुरूच्या गोलंदाजीत विविधता नसल्यामुळे यंदाचा हंगाम या संघासाठी दमछाक करणारा ठरणार आहे.

शुक्रवारी रात्री कोलकाताविरुद्ध १८३ धावांच्या आव्हानाचा बचाव करताना बंगळुरूचे गोलंदाज प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यामुळे बंगळुरूला सात गड्यांनी पराभव पत्करावा लागला. विशाख विजयकुमार हा एकमेव गोलंदाज असा होता ज्याने 'नकल बॉल'चा चांगला वापर करत २३ धावांत गडी बाद केला. पण, संघातील इतर अनुभवी गोलंदाज विविधता आणण्यात अपयशी ठरले. विजयकुमारने सामन्यानंतर सांगितले की, दुसऱ्या डावात फलंदाजी करणे अधिक सोपे होते; कारण दव असल्यामुळे चेंडू वेगाने बॅटवर येत होता. मी हार्ड लेंथ बॉल टाकण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही फलंदाजांना रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना रोखू शकलो नाही.

फिरकीपटूंची अडचण झाली : डूप्लेसी
बंगळुरूचा कर्णधार फाफ डूप्लेसी म्हणाला की, आम्ही मॅक्सवेलचा वापर केला. बोटाने चेंडू फिरवणारे येथे प्रभावी ठरतात. पण, कोलकाताविरुद्ध चेंडू वळत नव्हता. कोलकाताचा संघ उजव्या आणि डावखुऱ्या दोन्ही फलंदाजांसोबत खेळत असल्यामुळे फिरकीपटूंना चेडू टाकण्यात अडचण येत होती. दोन्ही बाजूंनी चेंडू वळवणारा गोलंदाज आम्हाला हवा आहे.

Web Title: IPL 2024: Defeat reveals limitations of royal challengers bangalore team's bowlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.