Join us  

मथिशा पथिरानाचा भन्नाट मारा, पण रिषभ पंतची सूसाट फटकेबाजी; CSK समोर तगडे आव्हान

पृथ्वी शॉ व डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावा चोपल्या होत्या. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 9:15 PM

Open in App

IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi - ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्व कौशल्याने पुन्हा एकदा कमाल करून दाखवली. गोलंदाजीत सातत्याने बदल करून त्याने दिल्ली कॅपिटल्सची सामन्यावरील पकड सैल केली आणि त्यानंतर मथिशा पथिरानाने एका षटकात कमाल केली. डेव्हिड वॉर्नरनंतर कर्णधार रिषभ पंतने अर्धशतक पूर्ण करून दिल्लीला सन्मानजनक धावा उभ्या करून दिल्या. चेन्नई सुपर किंग्सचा पथिराना पहिल्या इंनिंग्जचा नायक ठरला. 

दिल्ली कॅपिटल्स सहज दोनशे पार जातील असे वाटले होते. पृथ्वी शॉ व डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावा चोपल्या होत्या. पण, मथिशाने २ चेंडूंत भन्नाट यॉर्करवर दिल्लीच्या दोन फलंदाजाचे त्रिफळे उडवून CSK ला फ्रंटसीटवर बसवले. पृथ्वी शॉ याने मिळालेल्या संधीचे सोनं करताना २७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४३ धावा केल्या. वॉर्नर ३५ चेंडूंत ५ चौकार ३ षटकारांसह ५२ धावांवर माघारी परतला.  रिषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि मिचेल मार्श त्याच्या सोबतीला उभा राहिला. मात्र, पथिराना अप्रतिम चेंडूवर मार्शचा ( १८) त्रिफळा उडवला आणि त्यानंतर त्रिस्तान स्तब्सचाही ( ०) त्रिफळा उडवला. दोन स्फोटक फलंदाज माघारी परतल्याने दिल्लीची सामन्यावरील पकड निसटली होती आणि   रिषभ पंतवर सर्व मदार होती.  रिषभने ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, परंतु पथिरानाने पुढच्याच चेंडूवर त्याची विकेट घेतली. रिषभ ३२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५१ धावांवर ऋतुराजच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पथिरानाची ही आजच्या सामन्यातली तिसरी विकेट ठरली. पथिरानाने ४-०-३१-३ अशी स्पेल टाकली. दिल्लीने ५ बाद १९१ धावा केल्या. 

 

टॅग्स :आयपीएल २०२४चेन्नई सुपर किंग्सरिषभ पंतदिल्ली कॅपिटल्स