MS Dhoni ने चपळाईने पृथ्वी शॉचा झेल टिपला अन् ट्वेंटी-२०त वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला 

महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) इतिहास रचला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 08:49 PM2024-03-31T20:49:04+5:302024-03-31T20:49:17+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Updates - MS Dhoni becomes the FIRST ever wicketkeeper to take 300 dismissals in T20 cricket | MS Dhoni ने चपळाईने पृथ्वी शॉचा झेल टिपला अन् ट्वेंटी-२०त वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला 

MS Dhoni ने चपळाईने पृथ्वी शॉचा झेल टिपला अन् ट्वेंटी-२०त वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi - पृथ्वी शॉ याने मिळालेल्या संधीचे सोनं करताना आज डेव्हिड वॉर्नरसह पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. या दोघांनी चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. पण, महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) इतिहास रचला. 

अद्भुत, अद्वितीय! David Warner चा फटका अन् मथिशा पथिरानाची हवेत झेप, MS Dhoni स्तब्ध, Video 


स्वींग होणाऱ्या खेळपट्टीवर या दोघांनी पहिली ४ षटकं संयम दाखवला अन् नंतर प्रहार सुरू केला. दीपक चहरच्या तिसऱ्या षटकात वॉर्नरने २,६,४,४,१ अशी फटकेबाजी केली. चहरच्या पहिल्या ३ षटकांत DC च्या सलामीच्या जोडीने ३४ धावा कुटल्या. १०व्या षटकात रहमानच्या गोलंदाजीवर वॉर्नरने रिव्हर्स स्वीप मारला, परंतु पथिरानाने हवेत झेपावत अप्रतिम झेल टिपला. वॉर्नर ३५ चेंडूंत ५ चौकार ३ षटकारांसह ५२ धावांवर माघारी परतला अन् पृथ्वीसह ९३ धावांची भागीदारी संपुष्टात आली. 



११व्या षटकात पृथ्वीने षटकाराने जडेजाचे स्वागत केले, परंतु चौथ्या चेंडूवर त्याची विकेट पडली. पृथ्वी २७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर धोनीच्या हाती झेल देऊन परतला.  ट्वेंटी-२०तील धोनीचा हा ३०० वा बळी ठरला.  कामरान अकमल व दीनेश कार्तिक यांच्या नावावर प्रत्येकी २७४ बळी आहेत.  रिषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि मिचेल मार्श त्याच्या सोबतीला उभा राहिला. मात्र, पथिराना अप्रतिम चेंडूवर मार्शचा ( १८) त्रिफळा उडवला. 

Web Title: IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Updates - MS Dhoni becomes the FIRST ever wicketkeeper to take 300 dismissals in T20 cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.