IPL 2024, Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi Live: पॉवर प्लेमध्ये धक्के बसल्यानंतर कर्णधार रिषभ पंत व अक्षर पटेल यांनी शतकी भागीदारी करून दिल्ली कॅपिटल्सला सावरले. गुजरात टायटन्सच्या संदीप वॉरियर्सने पहिल्या सहा षटकांत DC चे आघाडीचे तीन फलंदाज माघारी पाठवले. नूर अहमद व राशिद खान यांनी अफलातून झेल घेतले. पण, रिषभ व अक्षर या जोडीने GT ला सडेतोड उत्तर दिले. त्रित्सान स्तब्सची फटकेबाजी पाहून गुजरात स्तब्ध झाले.
पृथ्वी शॉच्या विकेटवरून वाद! फ्रँचायझीने अम्पायरच्या निर्णयावर घेतला संशय, गांगुली नाराज
प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी धडपडणारे गुजरात टायटन्स व दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ समोरासमोर आले आहेत. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि संदीप वॉरियरने पॉवर प्लेमध्ये DC ला तीन धक्के दिले. दिल्लीने पृथ्वी शॉ याच्यासोबत जॅक फ्रेझर-मॅकगर्क याला सलामीला पाठवले. त्याने आक्रमक फटकेबाजी करून २३ धावा जोडल्या, परंतु संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. पृथ्वी ( ११) आणि शे होप ( ५) यांचे अनुक्रमे नूर अहमद व राशिद खान यांनी अविश्वसनीय झेल घेतले. दिल्लीला ४४ धावांत ३ धक्के बसले. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अक्षर पटेलकडून यजमानांना आशा होती.