IPL 2024, Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi Live: रिषभ पंतची ( Rishabh Pant) वादळी खेळी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पाहायला मिळाली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या टीम इंडियासाठी रिषभने आज त्याची दावेदारी सांगितली. त्याने मोहित शर्माने टाकलेल्या २०व्या षटकात २,१w,6,4,6,6,6 अशा ३१ धावा जोडल्या. आयपीएलमध्ये एका षटकात सर्वाधिक वेळा २० किंवा त्यापेक्षा धावा चोपणाऱ्या भारतीयांमध्ये रिषभने ( ८) रोहित शर्माशी बरोबरी केली. महेंद्रसिंग धोनी ( १०) या विक्रमात पुढे आहे. रिषभची आजची फटकेबाजी ही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी दावेदारी सांगणारी ठरली. त्याने ४३ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ८८ धावांची खेळी केली.
पृथ्वी शॉ ( ११), जॅक फ्रेझर-मॅकगर्क ( २३) व शे होप ( ५ ) यांना संदीप वॉरियरने माघारी पाठवले. पण, रिषभ पंत व अक्षर पटेल यांनी चौथ्या विकेटसाठी ६८ चेंडूंत ११३ धावा जोडल्या. अक्षरने ४३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६६ धावा केल्या. त्रिस्तान स्तब्स डग आऊटमधूनच सेट होऊन आला आणि त्याने स्तब्स ७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह २६ धावांवर नाबाद राहिला. रिषभने २०व्या षटकात २,१w,६,४,६,६,६ अशी तुफान फटकेबाजी केली आणि संघाला ४ बाद २२४ धावांपर्यंत पोहोचवले. दिल्लीने शेवटच्या १० चेंडूंत ५० धावा जोडल्या.
IPL 2024 मध्ये सर्वाधिक धावा:३७९ - विराट कोहली३४९ - ऋतुराज गायकवाड३४२ - रिषभ पंत३२४ - ट्रॅव्हिस हेड३१८ - रियान पराग३१४ - संजू सॅमसन३११ - शिवम दुबे३०३ - रोहित शर्मा
गुजरातचा गोलंदाज मोहित शर्माने स्वतःच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला. त्याने आज ४ षटकांत ७३ धावा दिल्या आणि त्यामुळे आयपीएल इतिहासातील ही सर्वात महागडी स्पेल ठरली. २०१८ मध्ये बसील थम्पाने RCB विरुद्ध ७० धावा दिल्या होत्या.