IPL 2024, Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi Live : हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला सहावा पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफचा मार्ग खडतर झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या २५७ धावांचा पाठलाग करताना मुंबईला ९ बाद २४७ धावा करता आल्या. DC ने १० धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यानंतर हार्दिक पांड्याने मधल्या षटकांत आलेल्या अपयशाला दोष दिले, परंतु माजी अष्टपैलू इरफान पठाणने ( Irfan Pathan) नेमकं कुठे चुकले ते सांगितले.
Jake Fraser-McGurk ने २७ चेंडूंत ११ चौकार व ६ षटकारांसह ८४ धावा कुटल्या आणि अभिषेक पोरेलसह ( ३६) ११४ धावा फलकावर चढवल्या. शे होप ( ४१) व रिषभ पंत ( २९) यांनी तिसऱ्या विकेटसाठी २४ चेंडूंत ५४ धावा जोडल्या. रिषभ व त्रिस्तान स्तब्स जोडीने २७ चेंडूंत ५५ धावांची फटकेबाजी केली. स्तब्सने २५ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ४८ धावा करून संघाला ४ बाद २५७ धावांवर पोहोचवले. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला ९ बाद २४७ धावाच करता आल्या. इशान किशन ( २०), रोहित शर्मा ( ८), सूर्यकुमार यादव ( २६) कमी धावांवर माघारी परतले. हार्दिक पांड्या ( ४६) व तिलक वर्मा यांनी ३९ चेंडूंत ७१ धावा जोडल्या.
इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या रसिख सलामने ३ धक्के देताना मॅच फिरवली. टीम डेव्हिडची ( ३७) १८व्या षटकातील विकेटने सामना फिरवला. तिलक शेवटपर्यंत खिंड लढवण्यासाठी उभा राहिला होता, परंतु तो दुर्दैवाने रन आऊट झाला. तिलक ३२ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ६३ धावांवर माघारी परतला. दिल्लीने १० धावांनी सामना जिंकला.
हार्दिक पांड्या म्हणाला, हा खेळ अधिकाधिक चुरशीचा अन् अटीतटीचा होत चालला आहे. याआधी काही षटकांच्या फरकाने विजय मिळत होता, आता काही चेंडूचा फरक राहिला आहे. या अशा सामन्यांमुळे गोलंदाजांवर प्रचंड दडपण येत आहे, त्यामुळे आम्ही ते करण्यास स्वत:ला पाठबळ दिले. मला या सामन्यातून काही निवडायचे असेल, तर मधल्या षटकांत आम्ही काही जोखीम पत्करायला हव्या होत्या. अक्षर पटेलविरुद्ध डावखुऱ्या फलंदाजांनी फटकेबाजी करायला हवी होती. गेम अव्हेरनेसच्या दृष्टीने हे आम्हाला जमले नाही. जॅक फ्रेझर-मॅकगर्कने जोखीत पत्करून फलंदाजी केली आणि तो मैदानात खरोखरच चांगला खेळला हे खूपच आश्चर्यकारक होते. त्यातून तरुणाईची निर्भयता दिसून येते.
इरफान पठाणचे अचूक बोट...
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर इरफान पठाणने ट्विट केले. त्याने लिहिले की, क्रिकेट हा एक लहान फरकाचा खेळ आहे आणि तो DCने MIविरुद्ध अगदी लहान फरकाने विजय होता. फ्रेझर मॅकगर्गविरुद्ध जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीने सुरुवात करायला हवी होती. तो यापूर्वी कधीही बुमराहला खेळला नव्हता, त्यामुळे कदाचित गोष्टी वेगळ्या असू शकल्या असत्या.
Web Title: IPL 2024, Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi Live : Irfan Pathan show big mistake of MI; Hardik Pandya says, Couple of overs in the middle, we could've taken some chances
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.