Join us  

Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने आज दिल्ली कॅपिटल्सला धू धू धुतले... पण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 11:07 PM

Open in App

IPL 2024, Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Marathi Update - राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने आज दिल्ली कॅपिटल्सला धू धू धुतले... पण, त्याच्या विकेटने वादाला तोंड फोडले. दिल्लीचे मालक स्टँडमध्ये बसून जोरजोरात आऊट आहे, आऊट आहे असे बोलताना दिसले. 

यशस्वी जैस्वालला पहिल्या चेंडूवर चौकार मिळाला खरा, परंतु खलील अहमदने दुसऱ्या चेंडूवर आखूड टप्प्यावर यशस्वीला झेलबाद केले. संजू सॅमसनने चांगली फटकेबाजी करून संघाची धावगती ११च्या सरासरीने कायम ठेवली होती. मुकेश कुमार पाचव्या षटकात गोलंदाजीला आला आणि पहिल्याच चेंडूवर जॉस बटलरचा उत्तुंग झेल उडाला होता. पण, स्तब्सला झेल टिपता आला नाही. त्यानंतर संजूने त्या षटकात १५  धावा कुटल्या. आयपीएलमध्ये २०० षटकार खेचणारा संजू हा पाचवा भारतीय फलंदाज ठरला. रोहित शर्मा ( २७६), विराट कोहली ( २५८), महेंद्रसिंग धोनी ( २४८), सुरेश रैना ( २०३) हे त्याच्या पुढे आहेत. पण, संजूने सर्वात कमी इनिंग्जमध्ये १५९ हा पराक्रम केला आहे आणि त्याने MS Dhoni ( १६५) विक्रम मोडला.   बटलरच्या विकेटसाठी रिषभने अक्षर पटेलला आणले. बटलरने चौकार-षटकार खेचूनही अक्षरने पाचच्या चेंडूवर बटलरचा ( १९) त्रिफळा उडवला. संजू उभा होता आणि त्याने संघाला १० षटकांत २ बाद ९३ धावांपर्यंत पोहोचवले. रियान पराग हात मोकळे करतच होता, परंतु रसिख सलामच्या चेंडूने त्याचा ( २७) त्रिफळा उडवला. दिल्ली हवी असलेली विकेट रसिखने मिळवून दिली. संजूने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून RR साठी खिंड लढवताना दिसला. परागची विकेट घेणाऱ्या रसिखच्या पुढच्या षटकात संजूने ६,४,६ असे फटके खेचले आणि त्यानंतर शुबम दुबे याच्यासह इशांत शर्मालाही ४,४,६ असे झोडले. संजूने दडपण एवढे वाढवले होते की, खलील अहमदने सलग चार वाईड चेंडू फेकले. RR च्या १५ षटकांत ३ बाद १५९ धावा झाल्या होत्या आणि त्यांना शेवटच्या ३० चेंडूंत ६३ धावा हव्या होत्या. १६व्या षटकात संजूने मिड ऑनवरून खणखणीत फटका मारला आणि शे होपने अप्रितम झेल घेतला. होपने काही इंचाच्या फरकाने स्वतःला सीमारेषेला टच होण्यापासून वाचवले. तिसऱ्या अम्पायरने बाद देताच संजूने काही काळ अम्पायरकडे दाद मागितली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. संजूला ४६ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ८६ धावांवर माघारी जावे लागले.  

टॅग्स :आयपीएल २०२४संजू सॅमसनदिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्स