Join us  

IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा अन् वादग्रस्त ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 11:42 PM

Open in App

IPL 2024, Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Marathi Update - राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा अन् वादग्रस्त ठरला. कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson )  याने २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RR ला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. पण, १६ व्या षटकात त्याची विकेट पडली अन् मॅच फिरली. त्याच्या विकेटने वाद निर्माण झाला आहे. १८व्या षटकात कुलदीप यादवने ४ धावा देत २ विकेट्स घेऊन सामना पूर्ण फिरवला. त्यानंतर RR ला पुनरागमन करणे अवघड झाले. 

Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला

जॅक फ्रेझर मॅकगर्क ( ५०) व अभिषेक पोरेल ( ६५) यांच्या आक्रमक फलंदाजीने DC चा पाया मजबूत केला. त्रिस्तान स्तब्सने  २० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४१ धावा केल्या. दिल्लीने ८ बाद २२१ धावा उभ्या केल्या. आर अश्विनने ४-०-२४-३ अशी अप्रतिम स्पेल टाकली. युझवेंद्र चहलने ( १-४८), ट्रेंट बोल्ट ( १-४८) व संदीप शर्मा ( १-४२) हे महागडे ठरले. २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल ( ४) अपयशी ठरला, परंतु त्यानंतर संजू सॅमसन व जॉस बटलर ( १९) यांनी ३३ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी केली होती. संजूने रियान परागसह ( २७) ३६ धावा जोडल्या, परंतु धावांचा वेग मंदावला. संजू मैदानावर शड्डू ठोकून उभा राहिला आणि त्याने RR ला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. १६व्या षटकात संजूची विकेट पडली, परंतु शे होपने घेतलेली कॅच वादग्रस्त ठरली.संजूला ४६ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ८६ धावांवर माघारी जावे लागले.   त्यानंतर दिल्लीने सामना फिरवला. शुभम दुबे १२ चेंडूंत २५ धावा करून बाद झाला. १८व्या षटकात कुलदीप यादवने ४ धावा देत २ विकेट्स घेऊन सामन्याला पूर्णपणे कलाटणी दिली. १२ चेंडूंत ३७ धावा RR ला करायच्या होत्या आणि रोव्हमन पॉवेल ही शेवटची आशा होती. ६ चेंडूंत २९ धावा RR ला करायच्या होत्या आणि मुकेशने पॉवेलचा ( १३) त्रिफळा उडवला. RR सा ८ बाद २०१ धावा करता आल्या आणि दिल्लीने २० धावांनी सामना जिंकला. सामन्यानंतर संजू सॅमसन म्हणाला, सामना आमच्या हातात होता. १०-११च्या सरासरीने धावा करायच्या होत्या आणि त्या शक्य होत्या, परंतु आयपीएलमध्ये अशा गोष्टी घडतात.  नाणेफेकीच्या निर्णयावर संजू म्हणाला, आम्ही दोन्ही गोष्टी चांगल्या केल्या. या परिस्थितीत काय करता येईल, यावर आम्हाला काम करायचं होतं. दिल्लीच्या फलंदाजांनी चांगली खेळी केली. त्यांच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली, अश्विनने आम्हाला विकेट मिळवून दिली. डेथ ओव्हरमध्ये आम्ही जास्त धावा दिल्या, असे मला वाटतं. आम्ही तीन सामने हरलो, परंतु ते अटीतटीचे होते. ही स्पर्धा तुम्हाला रिलॅक्स होण्याची संधी देत नाही.  

 

टॅग्स :आयपीएल २०२४संजू सॅमसनदिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्स