IPL 2024, Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad Live Marathi : सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना रोखणं हे भल्याभल्यांना अवघड होऊन बसलं आहे. तरीही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा धाडसी निर्णय दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने घेतला अन् तो त्याला महागात पडला. ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) दुसऱ्या चेंडूपासून फटकेबाजी सुरू केली आणि १६ चेंडूंत हाफ सेन्च्युरी ठोकली.
दिल्ली कॅपिटल्स आज इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा सामना करत आहे. हैदराबादने यंदाच्या पर्वात रेकॉर्डतोड धावा उभ्या केल्या आहेत आणि दिल्लीच्या गोलंदाजांना त्याचीच धास्ती असणार आहे. SRH ने सहा पैकी ४ सामने जिंकले आहेत, तर DC ला ७ पैकी ३ विजय मिळवता आले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीला बोलावले. डेव्हिड वॉर्नर दिल्लीच्या संघात परतला आहे आणि तो त्याच्या जुन्या संघाविरुद्ध खेळणार आहे.
ट्रॅव्हिस हेडने दुसराच चेंडू पुल शॉटद्वारे सीमापार पाठवला, त्यानंतर सलग दोन चौकार खेचले. अभिषेक शर्मानेही चौकार खेचून पहिल्या षटकाचा शेवट केला. हेडने दुसऱ्या षटकात ललित यादवची ६,६,०,४,१ असे फटके केचून अभिषेकला स्ट्राईक दिली आणि त्याने पुन्हा एकदा चौकाराने षटक संपवले. SRH ने पहिल्या दोन षटकांत ४० धावा कुटल्या. ट्रॅव्हिस हेडने यंदाच्या आयपीएलमध्ये ५ सामन्यांत १९९च्या स्ट्राईक रेटने २३५ धावा चोपल्या आहेत आणि १ शतकही त्याच्या नावावर आहे. त्याने हा फॉर्म दिल्लीविरुद्ध कायम राखलेला दिसला आणि हैदराबादने २.४ षटकांत पन्नास धावा फलकावर चढवल्या.
एनरिच नॉर्खियाने टाकलेल्या तिसऱ्या षटका हेडने ४,४,०,४,४,६ असे फटके खेचून १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकनेही फटकेबाजी केल्याने हैदराबादने ४ षटकांत ८३ धावा उभ्या केल्या.
Web Title: IPL 2024, Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad Live Marathi : SRH SMASHED FIFTY FROM JUST 2.4 OVERS AGAINST DC, TRAVIS HEAD SMASHED FIFTY FROM JUST 16 BALLS, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.