Join us  

SRH ची ऐतिहासिक कामगिरी, पण ३०० पार जाणाऱ्या हैदराबादला कुलदीप यादवने रोखले

ट्रॅव्हिस हेड ( Travis Head) व अभिषेक शर्मा ( Abhishek Sharma) यांच्या फटकेबाजीने अरुण जेटली मैदान दणाणून सोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 9:06 PM

Open in App

IPL 2024, Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad Live Marathi : ट्रॅव्हिस हेड ( Travis Head) व अभिषेक शर्मा ( Abhishek Sharma) यांच्या फटकेबाजीने अरुण जेटली मैदान दणाणून सोडले. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने ट्वेंटी-२० क्रिकेट इतिहासातील पॉवर प्लेमधील सर्वोच्च धावसंख्या कुटल्या. कुलदीप यादवने ४ विकेट्स घेऊन दिल्ली कॅपिटल्सला सामन्यात पुनरागमन करून दिले, परंतु SRH ला मोठी धावसंख्या उभारण्यापासून ते नाही रोखू शकले. आयपीएल  इतिहासात तीनवेळा २५० हून अधिक धावा करणारा हैदराबाद हा पहिलाच संघ ठरला. ( SUNRISERS HYDERABAD BECOMES THE FIRST TEAM TO SMASH 250 SCORE THRICE IN IPL HISTORY ) 

 १७ चेंडूंत ८० धावा! Travis Head ने बेक्कार चोपला ना भावा...; SRH करू शकतात ३४८ धावा

खलिल अहमदच्या दुसऱ्या चेंडूपासून त्यांनी षटकारांची आतषबाजी सुरू केली, ती थेट ७व्या षटकापर्यंत सुरू राहिला. या ७ षटकांत हेडने १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. SRH ने २.४ षटकांत विक्रमी पन्नास धावा केल्या आणि ४.५ षटकांत रेकॉर्ड ब्रेकींग १०० धावा ओलांडल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासातील पॉवर प्ले मधील Power फुल कामगिरीही हैदराबादने केली. हेड व शर्मा यांनी १२५ धावा पहिल्या सहा षटकांत उभ्या करून विक्रम नोंदवला. कुलदीप यादवने हे वादळ रोखले आणि अभिषेक १२ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह ४६ धावांवर झेलबाद झाला. अक्षर पटेलने अप्रतिम झेल घेतला आणि १३१ धावांची भागीदारी तुटली.  त्याच षटकात कुलदीपने SRH ला दुसरा धक्का देताना एडन मार्करम ( १) याला बाद केले. कुलदीपने दिल्लीला दिलासा देणारी विकेट मिळवून दिली. त्याने हेडला बाद केले, ज्याने ३२ चेंडूंत ११ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ८९ धावा कुटल्या. अक्षरने १०व्या षटकात हेनरिच क्लासेनचा ( १५) त्रिफळा उडवून दिल्लीला चौथी विकेट मिळवून दिली. धमाकेदार सुरुवातीनंतर SRH ने २३ धावांत ४ विकेट्स गमवाल्या आणि त्यातल्या तीन विकेट्स कुलदीपने घेतल्या. या विकेटनंतर हैदराबादच्या धावांची गती काहीशी मंदावली.  नितिश कुमार रेड्डी व शाहबाज अहमद यांनी १४.५ षटकांत संघाच्या दोनशे धावा पूर्ण केल्या. आयपीएल इतिहासातील या चौथ्या वेगवान दोनशे धावा ठरल्या. RCB ने २०१६ मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध १४.१ षटकांत द्विशतक झळकावले होते. त्यानंतर पुढील तिन्ही वेगवान द्विशतक हे SRH ( 14.4 overs vs MI, 2024, 14.5 overs vs DC*, 2024 आणि 15 overs vs RCB, 2024) च्या नावावर आहेत. सेट झाल्यावर या दोन्ही फलंदाजांनीही हात मोकळे केले. कुलदीपने आणखी एक धक्का देताना रेड्डीला ( ३७) झेलबाद केले. त्याने ४ षटकांत ५५ धावांत ४ विकेट्स घेतल्या. शाहबादने  २९ चेंडूंत नाबाद ५९ धावा चोपल्या संघाला ७ बाद २६६ धावांपर्यंत पोहोचवले. 

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्सकुलदीप यादव