Ananya Pandey Viral Video : कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून तिसऱ्यांदा आयपीएलचा किताब जिंकला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केकेआरला विजेतेपद पटकावता आले. (IPL 2024 Latest Video) केकेआर चॅम्पियन झाल्यानंतर सर्व शिलेदारांनी एकच जल्लोष केला. संघाचा मालक शाहरूख खान, सुहाना खान, अनन्या पांडे आणि शनाया कपूर सामना पाहण्यासाठी उपस्थित होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केकेआरच्या खेळाडूंसोबत अभिनेत्री अनन्या पांडे डान्स करताना दिसत आहे. (IPL 2024 News)
अनन्या पांडे आणि केकेआरचे खेळाडू डान्स करत आहेत. यामध्ये अष्टपैलू आंद्रे रसेलही दिसत आहे. चंद्रकांत पंडित हे देखील व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. अनन्याच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा करताना पडद्यामागील हिरोंवर पैशांचा वर्षाव केला आहे. आता ग्राउंड स्टाफच्या कर्मचाऱ्यांना २५-२५ लाख रूपये मिळणार आहेत. ही रक्कम १० मैदानातील कर्मचाऱ्यांना मिळेल. तर तीन अतिरिक्त स्टेडियममधील कर्मचाऱ्यांना देखील चांगले मानधन मिळणार आहे.
दरम्यान, आयपीएल विजेत्या संघासह उपविजेत्या संघावर देखील पैशांचा वर्षाव झाला. आयपीएल विजेत्या केकेआरच्या संघाला २० कोटी रूपये मिळाले. तर उपविजेत्या हैदराबादच्या संघाला बक्षीस म्हणून १२.५ कोटी मिळाले. तिसऱ्या स्थानी राहिलेल्या राजस्थान रॉयल्सला ७ कोटी आणि चौथ्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ६.५ कोटी रूपये मिळाले.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील केकेआरने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा दारूण पराभव केला. एकतर्फी झालेल्या सामन्यात केकेआरने मोठा विजय मिळवून किताब जिंकला. सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने स्फोटक खेळी केली. केकेआरचा संघ सर्वप्रथम २०१२ मध्ये आयपीएलचा चॅम्पियन झाला होता. त्यानंतर २०१४ आणि २०२४ मध्ये त्यांना किताब जिंकण्यात यश आले. केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोनदा आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली एकदा आयपीएल जिंकली.